शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवडीवरून राडा; हिंगोलीतील वायचाळ पिंपरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:19 IST

crime news मध्यस्ती करण्यास गेलेल्या पीएसआय मारुती नंदे यांनासुद्धा जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देविरोधी गटातील काही महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केलातू या गटाकडून मतदान का करीत आहेस, असे म्हणत सदस्याला मारहाण.

गोरेगाव (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे ८ फेब्रुवारी रोजी सरपंच निवडीप्रसंगी विरोधी गटाकडून ग्रामपंचायत सदस्य महिलेला मारहाण केल्याने मोठा गोंधळ उडाला. यात दोन गटांत हाणामारीही झाली. दरम्यान, चोख पोलीस बंदोबस्तात गुप्त मतदानाद्वारे सरपंच निवड पार पडली. गावाला छावणीचे स्वरूप आले होते.

सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे एकूण नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलचे तीन उमेदवार निवडणुकीत विजयी झाले, तर विकास आघाडी पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले होते. दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या बिनविरोधपैकी एका महिला सदस्यावर दोन्ही गटांकडून दावा केला जात होता. मात्र, ही महिला एका गटासमवेत सहलीवर गेली होती. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सरपंच निवड सताना दोन्ही पॅनलकडून सरपंच - उपसरपंच पदासाठीचे अर्ज दाखल करण्यात आले होते. दुपारी २ वाजता अर्ज मागे घेत सरपंच निवड प्रक्रिया सुरू होणार असताना पाच सदस्य संख्याबळ असलेल्या महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलचे सदस्य ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित झाले. त्याचवेळी विरोधी गटातील काही महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करीत तू या गटाकडून मतदान का करीत आहेस, असे म्हणत बिनविरोध निवडून आलेल्या सुमन दिलीप सातकर (वय ४५) यांना मारहाण केली.

याप्रसंगी दोन गटांत हाणामारीही झाली. मध्यस्ती करण्यास गेलेल्या पीएसआय मारुती नंदे यांनासुद्धा जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे. परिस्थिती आवाक्याबाहेर गेली असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, ग्रामीणचे डीवायएसपी वाखोरे, पो. नि. सुरेश दळवे यांनी वायचाळ पिंपरी येथे भेट दिली. तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून जमावाला पांगवण्यात आले. नंतर एसआरपी प्लाटून तुकडीसह तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये सरपंच निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या सदस्य महिलेला कनेरगाव नाका येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असताना उपचारानंतर सरपंच निवडीच्या मतदानासाठी परत ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले होते. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाचशे मीटर आत प्रवेशबंदी करीत गुप्त पद्धतीच्या मतदानाद्वारे सरपंच निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.

प्रियंका भगत यांची सरपंचपदी निवडयावेळी परिवर्तन पॅनलच्या प्रियंका भगत यांची सरपंच म्हणून निवड झाली. मात्र, उपसरपंचाची मतदान प्रक्रिया झाल्यावर एक मतदान बाद झाल्याचे समोर आले. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना समान मते पडली. त्यानंतर ईश्वर चिठ्ठीवर निकाल लागला. यात विकास आघाडी पॅनलच्या प्रियंका विश्वास सोळंके यांची उपसरपंचपदी निवड झाली. त्यामुळे सरपंचपद एका गटाकडे, तर उपसरपंचपद दुसऱ्या गटाकडे गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsarpanchसरपंचHingoliहिंगोली