शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटातील बेबनाव उघड; खासदार हेमंत पाटील यांची मंत्री सत्तारांना थेट शिवीगाळ

By विजय पाटील | Updated: January 6, 2024 15:45 IST

हिंगोली जिल्हा नियोजनच्या निधीतील टक्केवारीवरून खासदारांची पालकमंत्र्यांना शिवीगाळ

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्युट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली.

६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यासाठी खा. हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदीही उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीलाच पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत निधी वाटपातील भेदभावावरून संताप व्यक्त केला. तर राज्यात एवढे जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येवून अशा पद्धतीने शेण खाणे योग्य नसल्याचे म्हटले. यावरून पालकमंत्री सत्तारही संतापले. त्यानंतर या दोघांत चांगलीच खडाजंगी झाली. पाटील यांनीही अशीच पद्धत चालू राहणार असेल तर तुम्ही किंवा तुमची माणसे जिल्ह्यात आले तर त्यांना शिवसैनिक पायाखाली तुडवतील, असा गंभीर इशारा सर्वांच्या साक्षीनेच दिला.

यामुळे वातावरण पेटल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. या भानगडीत कोणी मध्यस्थी करण्याचा मात्र प्रयत्न केला नाही. एकाही आमदाराने यावर चकार शब्द काढला नाही. मागील काही दिवसांपासून निधीच्या नियोजनावरून जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. कधी आमदारांची नाराजी तर कधी खासदारांची नाराजी होत असल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री व खासदारांचे जमेनापालकमंत्री सत्तार हे अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावर आले असतानाही त्यांनी खासदारांचे आरक्षणाच्या प्रश्नावरून उल्लू बनाविंग असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विभागीय नेते आनंद जाधव यांनी सत्तार यांना समज दिली जाईल, असे म्हटले होते. तर निधीवरून यापूर्वीही सत्तार व पाटील यांच्यात वाद उद्भवला होता. आ.बांगर यांचेही मध्यंतरी बिनसले होते. मागच्या वर्षी आ.तान्हाजी मुटकुळे यांचाही सत्तार यांच्यावर रोष असल्याचे दिसत होते.

शिंदे गटातील बेबनाव उघडहिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीपासूनच सुरू असलेल्या वादाला आता पुन्हा फोडणी बसली आहे. आधी आ.बांगर यांची नाराजी, आता खा. पाटील यांची नाराजी होत असल्याचे दिसत आहे. १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Hemant Patilहेमंत पाटीलAbdul Sattarअब्दुल सत्तारHingoliहिंगोली