मंजुरीतच अडकताहेत सिंचन विहिरींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:26 AM2021-03-07T04:26:52+5:302021-03-07T04:26:52+5:30

निधी नसल्यानेही ८५ कामे प्रलंबित आहेत. कुशलचा जवळपास ८६ लाखांचा निधी अडकून पडला आहे. म्हणजे कामनिहाय जवळपास एक लाखाचा ...

Proposals for irrigation wells are stuck in approval | मंजुरीतच अडकताहेत सिंचन विहिरींचे प्रस्ताव

मंजुरीतच अडकताहेत सिंचन विहिरींचे प्रस्ताव

googlenewsNext

निधी नसल्यानेही ८५ कामे प्रलंबित आहेत. कुशलचा जवळपास ८६ लाखांचा निधी अडकून पडला आहे. म्हणजे कामनिहाय जवळपास एक लाखाचा निधी अडकून पडल्याने लाभार्थींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी पदरमोड करून नंतर शासनाकडून निधी घेताना दमछाक होत आहे.

हिंगोलीत ३३७ कामे सुरूच नाहीत

एकीकडे सिंचन विहिरींचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याची ओरड असताना दुसरीकडे मंजुरीनंतरही सुरू न झालेल्या कामांची संख्या मोठी आहे. औंढा २२७, वसमत २२२, हिंगोली ३२७, कळमनुरी २२०, सेनगाव ५४ असे तालुकानिहाय चित्र आहे. त्यामुळे नवीन कामांना मंजुरी देताना रखडलेल्या व सुरू न झालेल्या कामांची अडचण येत आहे.

सही देता का साहेब?

मग्रारोहयोतून विहिरीसाठी ग्रामसभेत ठराव घेतलेले अनेक लाभार्थी पंचायत समितीत प्रस्ताव मंजुरीसाठी खेटे मारताना दिसत आहेत. हा प्रस्ताव पं.स.तून सीईओंकडे मंजुरीला जात होता. आधी पं.स.त व नंतर जि.प.त पडून राहात होता. आता पं.स.तच हे अधिकार दिले आहेत. मात्र नवीन प्रस्तावांना मंजुरीच दिली जात नसल्याने सही देता का साहेब सही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

तालुकानिहाय रखडलेली कामे

औंढा ८९३

वसमत ५२३

हिंगोली ६२९

कळमनुरी ६२०

सेनगाव ७९१

जिल्ह्याचे उद्दिष्ट

१००००

मंजूर

७१६५

पूर्ण

२६४९

आता शासनाने सिंचन विहिरींबाबत गटविकास अधिकारी स्तरावरच मंजुरीचे अधिकार दिले आहेत. आधीची कामे अनेक ठिकाणी रखडलेली आहेत. मात्र तरीही नवीन प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे. या मंजुरीसाठी कोणतीही अडचण नाही.

डॉ.मिलिंद पोहरे, उपमुकाअ, पंचायत

Web Title: Proposals for irrigation wells are stuck in approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.