शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याच्या अपहरणासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 17:40 IST

आरोपींनी लग्नासाठी म्हणून घेतली किरायाने गाडी

ठळक मुद्देतीन आरोपींची नावेही झाले निष्पन्नअपहरणकर्त्यांनी २ किलो सोने किंवा दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली होती

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : येथील जर्दा व्यापारी शेख कादर याचे दोन कोटी रुपयाचे अज्ञात आरोपीतांनी त्याचे अपहरण करून तेलंगणा बॉर्डरवरील जंगलात नेले होते. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली जीप हैदराबाद येथून जप्त केली  आहे. या प्रकरणातील तीन आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत.

आखाडा बाळापूर येथील जर्दा व्यापारी शेख कादर याचे २५ जून रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री त्याच्या मुलाला फोन  करून अपहरणकर्त्यांनी २ किलो सोने किंवा दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली. अन्यथा व्यापाऱ्याला मारून टाकण्याची धमकी दिली. ४ वाजेपर्यंत पैसे न दिल्यास बापाचे प्रेत घेवून जा, अशी धमकीही देण्यात आली होती. बाळापूरचे ठाणेदार गणेश राहिरे यांनी तातडीने कारवाई घेवून व्यापाऱ्याची तेलंगना सिमेवरील हुंडा गावाच्या शिवाराच्या जंगलातून मुक्तता केली;परंतु अपहरणकर्ते गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे  वेगात फिरवली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार संजय मार्के, कांबळे यांचे पथक हैदराबादकडे रवाना झाले होते. २७ जून रोजी रात्री उशिरा अपहरणासाठी  वापरलेल्या गाडीचा शोध लागला.

लग्नासाठी म्हणून गाडी किरायाने घेतलीजुने  हैदराबादमधील कालापत्थर न्यू रोड येथील रहिवाशी असलेले महमंद अतिक महमंद जागीर यांच्या मालकीची सदर जीप आहे. ही गाडी भाड्याने देवून ते उपजिविका चालवितात. २१  जून रोजी भावाचे लग्न असल्याचे सांगून अजहर नामक व्यक्तीने सदर  गाडी भाड्याने घेतली. तेव्हापासून ही गाडी त्यांच्याच ताब्यात होती. यातील दोन आरोपीतांचे नावे निष्पन्न झाले असल्याचेही पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस