शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: May 8, 2024 16:09 IST

कोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत.

हिंगोली : हिंगोली शहरातील पेन्शनपूरा भागातून पोलिसांनी तब्बल ४२ जनावरे संशयावरून पकडली. सर्व जनावरे ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात बांधली आहेत. ही कारवाई ७ मे रोजी रात्री करण्यात आली.  दरम्यान, जनावरांचा दाखला दाखवून जनावरे घेऊन जाण्याचे आवाहन करूनही बुधवारी दुपारपर्यंत कोणी दाखला आणला नव्हता. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहेत. 

शहरातील पेन्शनपूरा भागात काही घराजवळ जनावरे बांधलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात आल्याचा संशय असल्याने पोलिसांनी जनावरे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, निरीक्षक विकास पाटील, नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, बोधगिरे, उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार संभाजी लकुळे, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, संजय मार्के यासह स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी, अंमलदारांचा ताफा मंगळवारी रात्री पेन्शनपुरा भागात दाखल झाला. 

यावेळी पाहणी केली असता तब्बल ४२ जनावरे आढळून आली. काही जणांकडे जनावरांबाबत चौकशी केली असता समाधाकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सर्व ४२ जनावरे ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणली. यावेळी काही जणांनी ही जनावरे आपल्या मालकीची असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जनावरांचे दाखले दाखविण्याच्या सूचना केल्या. मात्र ८ मे रोजी दुपारपर्यंत कोणीही जनावरांचे दाखले दाखल करू शकले नाहीत. 

पोलिस ठाण्यातच चाऱ्या,पाण्याची सोयदरम्यान, पोलिस ठाण्यात जनावरे आणून बांधली आहेत. दाखला दाखविल्यानंतरच मूळ मालकाला जनावरे सुपूर्द केली जाणार आहेत. बुधवारी दुपारपर्यंत कोणीही दाखला दाखल केला नसल्यने पोलिस ठाण्याच्या आवारातच जनावरे बांधली आहेत. येथेच हिरवा चारा, पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पोलिस अधिकारी, अंमलदारांनी सकाळी हिरवा चारा जनावरांना टाकला होता. 

...तर  गोशाळेत जनावरे होणार दाखलकोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत. या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात आली असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी काही जणांची चौकशीही सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र चौकशीनंतरच जनावरे कोणी आणली, कोणाची आहेत हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली