लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सर्वच उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात काही गावांत मात्र एकही उमेदवार उत्तीर्ण न झाल्याने जागा रिक्त ठेवण्याची वेळ आली आहे.हिंगोली जिल्ह्यात ४४९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आली होती. त्याची परीक्षा व मुलाखती झाल्यानंतर निकालाची प्रतीक्षा होती. आज सेनगाव, कळमनुरी, हिंगोली तालुक्याचा निकाल जाहीर झाला आहे. यात हिंगोली तालुक्यातील ५३ जणांची यादी डकविण्यात आली आहे. तर वसमत उपविभाग ६१, कळमनुरी तालुका ५० आणि सेनगाव ५६ जणांची यादी डकविण्यात आली आहे. उप विभागीय कार्यालयात लावलेली उमेदवारांची यादी पाहण्यासाठी एकच गर्दी होत होती. अनेक जन तर आप-आपली नावे अगदी बारकाईने न्याहळत होते. आपल्या शेजारच्या गावातील उमेदवारांचीही नावे यादीत आल्याचे फोनद्वारे सांगत होते. यादीत नावे नसणारे मात्र निराश होऊन काढता पाय घेत होते.
पोलीस पाटील भरतीचा निकाल झाला जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:13 IST