शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ क्रूरकर्मा पित्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:53 IST

भांडणात मुलगा आईचीच साथ देतो या कारणामुळे स्वत:च्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा पित्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आखाडा बाळापूर : भांडणात मुलगा आईचीच साथ देतो या कारणामुळे स्वत:च्या मुलाचा खून करणाऱ्या क्रूरकर्मा पित्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवासी बाबूराव भगवानराव शिखरे याने स्वत:च्या पोटच्या पोराला क्रूरपणे ठार केले. शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास नांदेड हिंगोली रोडवरील कुर्तडी फाट्यावरील रस्त्यावर पोराला आॅटोत आणून त्याने दोरीने गळफास दिला. त्यानंतर आॅटोवर आपटून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.सातव्या वर्गात शिकणाºया वैभव बाबूराव शिखरे या तेरा वर्षे मुलाच्या खुनाच्या आरोपावरून बाळापुर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये बाबूराव शिखरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोउपनि सविता बोधनकर, गजानन भालेराव, संतोष नागरगोजे, गजानन मुलगीर यांनी आरोपीस अटक केले. ३० डिसेंबर रोजी आरोपीस कळमनुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोनि गणेश राहिरे यांनी दिली. या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आखाडा बाळापूर परिसरात मुलाच्या निर्दयी खुनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पित्याच्या या राक्षसी वृत्तीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस निरीक्षक राहिरे यांनी रविवारी वेगवेगळ्या पद्धतीने खुनाच्या तपासाच्या दिशा ठरविल्या आहेत. पित्याच्या हस्ते मुलाचा निर्दयपणे खून झाला यात अन्य कोणी सामील होते काय, हा कटाचा भाग होता का? या दिशेनेही तपास सुरू असल्याची माहिती राहिरे यांनी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMurderखून