शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दरोडेखोराकडून ६ जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त, तीन जिल्ह्यात गुन्ह्यांचे आहे रेकॉर्ड

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: September 4, 2023 18:14 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सलग दुसरी कारवाई

हिंगोली : नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या दरोडेखोराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ६ जिंवंत काडतूसांसह एक पिस्तूल जप्त केले. ही कारवाई वसमत तालुक्यातील हयातनगर येथे  ३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

वसमत तालुक्यातील हयातनगर येथील चांदू सुग्रीव जाधव (वय ३५) याने दोन दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश येथून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने हयातनगर गाठून चांदू जाधव याचे घरावर छापा टाकला. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक पिस्तूल व ६ जिवंत काडतूस आढळून आले. त्यास याबाबत विचारणा केली असता त्याने मध्यप्रदेश येथून ५५ हजारांना पिस्तूल व काडतूस खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली. पथकाने वेळीच पिस्तूल जप्त केल्याने भविष्यात होणारी  जीवित घटना टळण्यास मदत झाली. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, गणेश लेकूळे यांच्या पथकाने केली. 

तीन जिल्ह्यात गुन्हे दाखलदरम्यान, पिस्तूल व जीवंत काडतूस पकडल्यानंतर पोलिसांनी चांदू जाधव याची माहिती काढली असता त्याचेवर पूर्णा (जि. परभणी) येथे दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच भाग्यनगर (जि.नांदेड) येथे घरफोडीचे ५ गुन्हे दाखल असून हिंगोली जिल्ह्यातही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली