शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:21 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त्याची माहितीच मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त्याची माहितीच मिळत नाही.२0१७ मध्ये कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनीच ११३ कोटी रुपयांचा निधी मिळाला व तो खात्यावर वर्ग होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तो निधी पूर्णपणे लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे मे २0१८ मध्ये सांगितले जात आहे. मात्र या लाभार्थ्यांनाही खरेच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली व खाते बेबाकी झाले की नाही, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी अजूनही कर्जमाफीच्या नावाने बोंब ठोकत आहेत. ज्यांना माफी मिळाली नाही, त्यांची बोंब रास्त आहे. मात्र त्यांच्यासोबतच ज्यांना माफी मिळाली त्यांचेही यादीत नाव असताना बँकेत थकबाकी दिसत असल्याने त्यांचा तर दुप्पट आवेश आहे.ही योजनाच फसवी असल्याचे ही मंडळी सांगत सुटली आहेत. वारंवार योजनेत होणारा बदल, यासंदर्भात आलेले शेकडो निर्णय या योजनेला मारक ठरत आहेत.त्यामुळे खरेच याचा लाभ मिळाला की नाही, हेही कळायला मार्ग नाही. एकूण ४३५१२ खातेदारांना १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली. जि.म.स.च्या १७८२ खातेदारांचे २१.४९ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे १११२७ खातेदारांचे ५९.९८ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६२३३ खातेदवारांचे ३१.८0 कोटी रुपये खात्यावर वर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. तर जि.म.स.च्या ३२१८ जणांचे ४.९७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे २९७१ जणांचे २८.११ कोेटी तर ग्रामीण बँकेच्या २१४१ जणांचे १५.४७ कोटी अजूनही शिल्लक आहेत.आता नव्याने या योजनेची व्याप्ती वाढली आहे. तर २00१ पासूनच्या थकबाकीदारांनाही यात लाभ मिळणार आहे. याची माहिती संकलित करण्याचे काम नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीचे काम करतानाच या सरकारचा कार्यकाळ संपतो की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासनही या सर्व प्रकारामुळे बुचकळ्यात पडत आहे. बँकांनाही अशी माहिती देताना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.पुरावाच नाहीकाही शेतकºयांना अज्ञानामुळे आपला अर्ज मंजूर झाला की नाही, हे कळायला तयार नाही. तर काहींचा अर्ज मंजूर झाल्यानंतरही कर्जमाफी झाल्याचा काही पुरावा आहे काय? असा उलट सवाल बँकेत ऐकावा लागत आहे. बँकेने संबंधितांना सांगण्याऐवजी त्यांच्याकडूनच ऐकावे लागत आहे.शेतकºयाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. तर काही शेतकरी मात्र वाद घालून माहिती मिळवून निश्चिंत झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण ९८ बँक शाखांमधून कर्जमाफीसाठी नव्याने १८४६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात हिंगोली ८0८२, वसमत २९0२, औंढा ना-१0८४, कळमनुरी ३२३२ तर सेनगावातून ३१६९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. ते तालुका स्तरीय छाननी समितीकडे वर्ग करण्यात आले होते. या समितीने या अर्जांचीपडताळणी केली असून यापैकी १६२१७ अर्ज कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत. यात हिंगोली ६९0२, वसमत २0९0, औंढा ना-९९७, कळमनुरी २८३९ तर सेनगावातून ३३८९ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे.तालुकास्तरीय समितीच्या अधिकाºयांना आपली कामे सांभाळून हे काम करावे लागत आहे. वारंवार मिळणाºया मुदतवाढीत अर्ज येतच आहेत. त्यामुळे २२0४ अर्ज अजूनही पोर्टलवर अपलोड करणे बाकीच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी