लसीकरणाची कासवगती; गरज रोज दहा हजार डोसची, मिळतात पाच हजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:35+5:302021-05-09T04:30:35+5:30

१०० केंद्रांवर लस हिंगोली जिल्ह्यात अधिकृतरीत्या ३० केंद्रांवरून लस देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या लसींचा पुरवठा असल्याने हे सर्व ...

The pace of vaccination; Need ten thousand doses daily, get five thousand! | लसीकरणाची कासवगती; गरज रोज दहा हजार डोसची, मिळतात पाच हजार !

लसीकरणाची कासवगती; गरज रोज दहा हजार डोसची, मिळतात पाच हजार !

Next

१०० केंद्रांवर लस

हिंगोली जिल्ह्यात अधिकृतरीत्या ३० केंद्रांवरून लस देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या लसींचा पुरवठा असल्याने हे सर्व केंद्र सुरू आहेत. शिवाय रोज ६० ते ७० उपकेंद्रांतही लस दिली जात आहे. त्यामुळे १०० केेद्रांत लस दिली जात असल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट लवकर मिळत नाही. वीज गेल्याने केेंद्र दीड तास ठप्प होते. रांगांवर मात करण्यासाठी यावरही उपाय होणे गरजेचे आहे.

आकाश पद्मने, हिंगोली

मी कृषीचा कर्मचारी आहे. दुसरी लस घेण्यासाठी सरजूदेवी शाळेत आल्यावर सुलभपणे व कमी वेळेत लस मिळाली. या ठिकाणी सामाजिक अंतरासाठीही सोय केली.

शिवाजी घुगे, हिंगोली

कल्याण मंडपम् येथे दोन ठिकाणी वेगवेगळी व्यवस्था आहे. या ठिकाणी २०च्या लॉटने आत सोडले जात आहे. त्यामुळे आधी रांग होती. नंतर सर्व सुलभ झाले.

रमेश दराडे, हिंगोली

१८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे कल्याण मंडपम‌्वर

हिंगोलीत लसींसाठी तीन वेगवेगळी ठिकाणे केली. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे व ४५ पेक्षा जास्त वयाचे या दोन्ही वयोगटांना कल्याण मंडपम् येथे लस दिली जात आहे, तर दुसरा डोस व ज्येष्ठ नागरिकांना सरजूदेवी विद्यालयात व्यवस्था केली. त्यामुळे आता बऱ्यापैकी रांगांतून मुक्तता झाल्याचे दिसत आहे.

अपॉइटमेंट नसल्याने गर्दी

अनेकांना नोंदणी करायला गेल्यावर अपॉइंटमेंट भेटत नाही. अशांनी सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. केंद्राच्या ठिकाणीच काही होते काय याची चाचपणी केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून गर्दी नियंत्रण करताना दमछाक होत असल्याचे दिसत आहे.

Web Title: The pace of vaccination; Need ten thousand doses daily, get five thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.