शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे उदघाटन केले जाणार आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी जिल्हास्तरावर रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी कार्यक्रम होईल. ११ एप्रिल सामाजिक न्याय व सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती व त्या अंतर्गत कजार्चे वाटपाबाबत लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. १२ एप्रिल रोजी सर्व शासकीय कार्यालयामध्ये व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामध्ये स्वयंसेवी संस्थाच्या साह्याने स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. १३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील विचारवंत, नामवंत, पत्रकार, लोक कलावंत तसेच सामाजिक चळवळीतील प्रसिध्द व्यक्ती यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी ८.५० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादल कार्यक्रम होईल.जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याथीर्नी आणि नागरिकांनी सामाजिक समता सप्ताहमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक