शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड'; नागनाथ मंदिरासमोर भाजपाचे टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 18:53 IST

केवळ महाराष्ट्रात सणासुदीच्या काळातही मंदिरे का बंद आहेत असा प्रश्न भाजप कार्यकर्ते, पुजारी, मंदिर परिसरातील फुल,नारळ,अगरबत्ती,विक्रेत्यांनी उपस्थित केला.

औंढा नागनाथ : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावन मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर भाजपच्यावतीने आज सायंकाळी पाच वाजता टाळमृदंगाच्या गजरात शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी भाविकांसाठी धार्मिक स्थळे खुले करण्याची मागणी करत राज्य सरकारचा निषेध केला.

राज्यात दारूचे दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कोट्यावधी भक्त-भाविकांचे श्रद्धास्थान असलेले धार्मिक स्थळे बंद आहेत. देशामध्ये सर्वत्र मंदिर देवदर्शन सुरू करण्यात आलेली आहेत. केवळ महाराष्ट्रात सणासुदीच्या काळातही मंदिरे का बंद आहेत असा प्रश्न पुजारी, मंदिर परिसरातील फुल,नारळ,अगरबत्ती,विक्रेत्यांनी उपस्थित केला. धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी करत भाजपच्यावतीने टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन करून करण्यात आले. 

आंदोलनात किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर, शहराध्यक्ष औंढा बबन सोनुने , लोकसभा संघटक आशिष वाजपेयी, गजानन कुटे ,विलास काळे ,अँड शेषराव  कदम ,गणेश पाटील ,रवि डोंगरदिवे ,अनील भांडे,सर्जेराव दिंडे,सखाराम इगळे सह भाजपाचे कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील वारकरी संप्रदाय व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी,पुजारी,फुल-हार,नारळ,अगरबत्ती विक्रेते आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी औंढा पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लांडगे,जमादार अफसर पठाण,गजानन गिरी,शेख एकबाल यांनी मंदीर परिसरांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :BJPभाजपाHingoliहिंगोलीagitationआंदोलन