शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी यापुढे फक्त ‘सौर कृषीपंपच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:06 IST

यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.महावितरणला नवीन वीज जोडणी देण्यासाठी दुर्गम भागात येणाऱ्या अडचणी व त्यावरील खर्च परवडत नसल्याने हा उपाय केला आहे. ३१ मार्च २0१८ पर्यंत कोटेशन भरूनही कृषी जोडणी न मिळालेल्यांना यातच लाभ दिला जाणार आहे. नुकतेच एव्हीडीएस योजनेत ५१0२ कृषीपंपांना वीजजोडणीस मंजुरी मिळाली होती. यातीलही ६00 मीटरच्या आतील कामांची जोडणी दिली जाईल. उर्वरितांना सौरकृषीपंप देणार आहोत.या योजनेत नव्याने अर्ज करण्यासाठी ५ एकरापर्यंतच्या शेतकºयास ३ एचपी तर त्यापेक्षा जास्त शेती असल्यास ५ एचपीचा सौरपंप दिला जाणार आहे. यासाठी शेतकºयाकडे शाश्वत जलस्त्रोत असावा, अर्ज आॅनलाईन करावा लागेल, त्यात सातबारा, आधार, जवळच्या ग्राहकाचा क्रमांक आदी बाबी भराव्या लागणार आहेत. त्यामुळे कृषी वीजजोडणीसाठीही नवीन अर्ज करण्याचा विचार करणाºयांनी थेट याच योजनेत अर्ज करावा. यात सर्वसाधारण ग्राहकांना अडीच लाखांच्या युनिटसाठी दहा टक्के म्हणजे २५ हजार पाचशे रुपये तर अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना पाच टक्के म्हणजे १२ हजार ५00 रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम अनेकांना जास्त वाटत असली तरीही यात कृषीपंप मिळणार असल्याने तो खर्च वाचणार आहे. शिवाय यापुढे वीजबिलाचे झंझट राहणार नाही.दिवसा वीज मिळेल. कंपनी पाच वर्षांचा इन्शुरन्स काढणार आहे. शिवाय चोरी झाल्यास पोलिसांत तक्रार दिली की, विमा कंपनीकडून साहित्य मिळेल. त्याचबरोबर बिघाड झाल्यास महावितरणकडे तक्रार केल्यावर तीन दिवसांत दुरुस्ती करून मिळेल.हा पंप २५ वर्षांपर्यंत चालू शकतो, असा दावाही महावितरणकडून काढण्यात आलेल्या माहितीपुस्तिकेत केला आहे. तर आॅनलाईन अर्ज करण्यास काही अडचण आल्यास १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले.

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण