शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ४ यंत्रांनी डास आटोक्यात येतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१३ रक्तनमुने घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१३ रक्तनमुने घेण्यात आले आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान असल्याने विविध ठिकाणी डबके साचून त्यावर डासांची उत्पत्ती होत आहे. शिवाय गाजर गवताचे स्तोम वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक गावांत तापासह इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत. काही ठिकाणी डेंग्यसदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी उपाय योजना म्हणून डासांच्या निर्मूलनासाठी करावयाच्या पायराथ्रम औषध फवारणीच्या केवळ चारच मशिन हिवताप विभागाकडे उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस या मशिनची संख्या कमीच होत चालली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मागणी करूनही या मशिनने फवारणी करण्यास वावच मिळत नाही. यंदा साथसदृश्य स्थिती असलेल्या आठ गावांमध्ये हिवताप विभागाने पायराथ्रम औषधाची फवारणी केली. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात कुंरजंळ, सूर्यवाडी, धारखेडा, सेनगाव तालुक्यात वाघजाळी, वसतम तालुक्यात महमंदपूरवाडीत दोनदा तर वीरेगाव, कोर्टा मिळून ८ गावांत ग्रा.पं.च्या मागणीनुसार फवारणी केली. जिल्हा हिवताप कार्यालयाकडून केवळ ४ मशिनवरच कसे भागते, यासंदर्भात विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या खर्चातून मशिन घेतल्यामुळे कमी पडत नाहीत. मागणीनुसार फवारणी केली जाते. त्यामध्ये मशिनच्या इंधनाचा खर्च त्या- त्या ग्रा.पं.ला द्यावा लागतो. ही फवारणी करण्याआगोदर आमच्या कार्यालयाकडूनकिटकसमरक म्हणून एक पथक असते. ते सर्व्हे करून डासांची घनता व तपासणी करून त्यावर उपाययोजना म्हणून फवारणी करणे, जळालेले आॅईल नालीत टाकणे, असे डास निर्मूलनाचे उपाय सुचविते.डेग्ंयू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डेग्ंयूची लक्षणे तीव्र ताप येणे, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळयात दुखणे, अंगावर लालसर येणे, तीव्र पोट दुखणे, रक्तस्त्राव होणे इत्यादीचे लक्षणे आहेत.४डेग्ंयूवर उपचार म्हणून तापासाठी पॅरासिटामोल घेणे, भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे आवश्यक असते. या रोगांवर नियंत्रणासाठी डास निर्मूलन करणे व सामान्य जनतेपर्र्यंत आरोग्य शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य