मराठा सेवा संघ वसतिगृहावर जिजाऊ व्याख्यानमालेच्या संदर्भात बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक नियमांवलीचे पालन करुन यंदा ३ ते ५ जानेवारी दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत मंडळी, कृषी, युवक, राजकारण, स्त्री आदीं विषयावर आपली मते मांडणार आहेत. व्याख्यानमाला ऑनलाईन असली तरी दररोज जिजाऊ पूजन करुन ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाची लिंक सोशल माध्यमावर देण्यात येणार आहे. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मराठा सेवा संघाचे प्रदेश कोषाध्यक्ष खंडेराव सरनाईक, जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव ढोकर, सुधाकर बल्लाळ, पंडित अवचार, हरीभाऊ मुटकुळे, राजकुमार वायचाळ, ज्ञानेश्वर लोंढे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या वंदनाताई आखरे, जिल्हाध्यक्ष राजश्री क्षीरसागर, मिनाक्षीताई शिंदे, रेखा पडोळे आदींची उपस्थिती होती. फाेटाे नं. १३
जानेवारीत ऑनलाईन जिजाऊ व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST