शहरातील भाजीमंडईत कांदा, अर्द्रक महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:19 AM2021-02-22T04:19:04+5:302021-02-22T04:19:04+5:30

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात काढत आहेत. ग्राहकांना भाज्या स्वस्त मिळत असल्या तरी उत्पादकांचे मात्र ...

Onion and ginger are expensive in the vegetable market of the city | शहरातील भाजीमंडईत कांदा, अर्द्रक महागले

शहरातील भाजीमंडईत कांदा, अर्द्रक महागले

Next

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकरी भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात काढत आहेत. ग्राहकांना भाज्या स्वस्त मिळत असल्या तरी उत्पादकांचे मात्र आर्थिक नुकसान होत असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

शनिवारी शहरातील भाजीमंडईमध्ये भेंडी, २० रुपये, गवार शेंगा २५ रुपये, मुळा १०, वांगी १०, वालाच्या शेंगा १०, कोबी १०, फूलकोबी १०, बिटरुट १५, आलू १५ रुपये, टोमॅटो ५, गाजर १०, हिरवी मिरची २० रुपये किलोप्रमाणे विक्री झाले. तर शेपू १५, मेथी १० रुपयास जुडीप्रमाणे विकली गेली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे उत्पादक भाजीपाल्याची लागवडही मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे भाजीपाला स्वस्त दरात मिळत आहे. अजून दोन आठवड्यांनी पाण्याची कमतरता जाणवू लागल्यास भाजीपाला महाग होईल, असे मंडईतील विक्रेत्यांनी सांगितले. भाजीपाला स्वस्त असला तरी आलू, अर्द्रक, लसूण मात्र कमी प्रमाणात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यास मंडईत मागणी होती.

फळांची आवक कमीच

गत दोन आठवड्यांपासून शहरात फळांची आवक कमी असल्याचे पहायला मिळत आहे. फळबाजारात सफरचंद, डाळिंब, आंबे, संत्रा आदींची आवक कमी होती. अंगूर ६०, चिकू ५०, टरबूज ३०, खरबूज १०, अननस ६० रुपये किलोने विक्री झाले. या फळांची आवक जास्त होती.

प्रतिक्रिया..........

मागील तीन-चार आठवड्यांपासून भाज्या स्वस्त मिळत असल्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. रविवारी बाजारात कांदा, लसूण, अर्द्रकाची आवक कमी असल्यामुळे महाग घ्यावे लागले.

-मनीष नागरे,

ग्राहक

सध्यातरी जिल्ह्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव उतरले आहेत. विहिरींचे पाणी कमी झाल्यास भाजीपाल्यांचे भाव वाढतील. या आठवड्यात कांदा, लसणाची आवक कमीच राहिली आहे.

-महमद हरुण , भाजीविक्रेता

दोन आठवड्यांपासून सफरचंद, डाळिंब, संत्रा या फळांची आवक कमीच आहे. चिकू, टरबूज, खरबूज, अननस, अंगूर आदी फळांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

-शेख अकबर

फळविक्रेता, हिंगोलीा

Web Title: Onion and ginger are expensive in the vegetable market of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.