शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अपंग, मागासवर्गीयांचा एक कोटीचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:50 IST

ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती आहेत. यात २0 टक्के निधी मागासवर्गीयांना सार्वजनिक किंवा वैयक्तिक लाभासाठी देण्याची तरतूद आहे. यासाठी वित्त आयोगाचे तर यापूर्वीच आराखडे तयार केलेले आहेत. त्यातील कामे यातून करायची आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतींना १.३0 कोटी रुपयांची तरतूद मागच्या आर्थिक वर्षात करणे क्रमप्राप्त होते. यात हिंगोली १९.५ लाख, कळमनुरी -७५.६३ लाख, वसमत-११.६१ लाख, औंढा ना-४.६४ लाख तर सेनगाव १९.३५ लाख अशी तरतूद होती. एवढा खर्चही होणे अपेक्षित होते. मात्र मार्च २0१८ अखेरच्या खर्चाच्या तपशिलानुसार ९१.७७ लाखांचा अनुशेष आहे. तालुकानिहाय हिंगोली- १४.२0 लाख, कळमनुरी-७३.१८ लाख, वसमत-१.२७ लाख, औंढा ४१ हजार, सेनगाव-२.६९ लाख अशी स्थिती आहे. केवळ ३८.९७ लाखांचाच खर्च मागच्या आर्थिक वर्षात झाला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत ग्रामपंचायतींची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, पुन्हा अनुशेष वाढण्याची भीती आहे.कळमनुरीत मागासवर्गीयांसाठी तरतूद खर्च न झाल्याचा आकडा सर्वाधिक आहे. या तालुक्यात मागासवर्गीयांची संख्याही मोठी आहे. तरीही यात शिल्लक असलेल्या अनुशेषाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.या योजनेत काम करणाºया ग्रामपंचायतींनी खरेच ही कामे केली की कसे? याबाबतही शंकाच दिसून येत आहे.अपंगांसाठी ३ टक्के खर्चाच्या तरतुदीत हिंगोली ३.९0 लाख, कळमनुरी १४.१0 लाख, वसमत-२.९४ लाख, औंढा २.७९ लाख, सेनगाव ३.८७ लाख अशी २७.६१ लाखांची तरतूद होती. मात्र त्यापैकी अवघा १२.२८ लाखांचा खर्च झाला आहे. तर १५.३३ लाखांचा अनुशेष शिल्लक आहे. यात हिंगोली ८0 हजार,कळमनुरी १३.५९ लाख, वसमत-२९ हजार, औंढा २५हजार, सेनगाव ४0 हजार असे चित्र आहे. येथेही कळमनुरी तालुक्याची उदासीनताच असल्याचे दिसून येत आहे. यातही अपंगांना त्या तुलनेत काहीच सुविधा मिळत नसल्याचे सांगितले जाते.अनेक ग्रामपंचायतींकडून तर विविध योजनांत मागासवर्गीयांना निधी मिळतो, असे कारण सांगून कागदी कारभार करण्याचा प्रयत्न होतो. तरीही अनुशेष मात्र कायमच आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी