रुग्णसंख्या घटली; मात्र मृत्यूदर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:31 AM2021-05-11T04:31:35+5:302021-05-11T04:31:35+5:30

जिल्ह्यात २८४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी ३४ रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोली परिसरात १३३ पैकी १५ रुग्ण ...

The number of patients decreased; But the mortality rate remained the same | रुग्णसंख्या घटली; मात्र मृत्यूदर कायम

रुग्णसंख्या घटली; मात्र मृत्यूदर कायम

Next

जिल्ह्यात २८४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी ३४ रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोली परिसरात १३३ पैकी १५ रुग्ण आढळले. यात भटसावंगी १, विवेकानंदनगर १, आदर्श कॉलनी १, फाळेगाव २, नर्सी ३, आदर्श कॉलनी १, बळसोंड १, गाडीपुरा १, बांगरनगर १, कलावतीनगर १, कृष्णानगर १, तर हिंगोलीत एका रुग्णाचा समावेश आहे. वसमत परिसरात ४५ पैकी २ रुग्ण आढळले असून, दोन्ही रुग्ण टेंभुर्णी येथील आहेत. सेनगाव परिसरात ३५ पैकी ६ रुग्ण आढळले. यात जयपूर ३, हत्ता १, पळसी १, उमरदरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. औंढा परिसरात ३८ पैकी ५ रुग्ण आढळले असून, यात अंजनवाडा १, पुरजळ १, वसमत १, जवळा १ व औंढा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात ३३ पैकी ६ जण कोरोनाबाधित निघाले. यात सालापूर १, रेडगाव २, एसएसबी येलकी २, हदगाव १ या रुग्णांचा समावेश आहे.

आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात टालेहॉल गल्ली १, भटकाॅलनी १, जयपूर २, ग्रामीण पोलीस ठाणेजवळ १, देवडानगर १, वसमत १, पळसी येथील एक, असे ९ रुग्ण आढळले. औंढा परिसरात उंडेगाव १ व जवळाबाजार १, असे दोन रुग्ण आढळले.

दरम्यान, सोमवारी १०७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील ५१, लिंबाळा १२, वसमत १२, कळमनुरी १३, औंढा ८, तर सेनगाव येथील ११ बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १४ हजार २२८ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार १२६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ३६० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ३० रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

आतापर्यंत २८५ रुग्णांचा मृत्यू

सोमवारी जिल्ह्यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या वरूड गवळी येथील ६५ वर्षीय पुरुष, मस्तानशाहनगर येथील ४० वर्षीय महिला, रिसोड येथील ७१ वर्षीय पुरुष, अंबिकानगर येथील ६० वर्षीय पुरुष, लासीना येथील ६६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The number of patients decreased; But the mortality rate remained the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.