शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 18:13 IST

कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.

कळमनुरी (हिंगोली ) : कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली.

कळमनुरी तालुक्यातील कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश १२ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी दिले होते. त्यानंतर पिकांवरील नुकसानीच्या पंचनाम्याचे सर्वेक्षण करून हा अहवाल १० दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, २५ सज्जाच्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी अद्यापही अहवाल सादर केला नाही.

दरम्यान, २ जानेवारी रोजी तालुक्यातील मसोड, येहळेगाव (गवणी), घोडा, डोंगरगाव पुल, शेवाळा, वारंगा, शिवणी, कान्हेगाव, डोंगरकडा या १० दहा गावांचे अहवाल तहसील कार्यालयास प्राप्त झाले होते. संबंधित शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन कापूस व धान पिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आदेश देऊनही २० दिवसांचा कालावधी लोटला तरीही नुकसानींचे अहवाल सदर कार्यालयास प्राप्त झाले नाहीत. 

त्यानंतर आता तहसीलदार यांनी संबंधित कर्मचार्‍यांना २४ तासांच्या आत केलेल्या पंचनाम्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचना नोटिसीद्वारे दिल्या असून विलंब झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद केले आहे.त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नाही, सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची असून ही बाब खेदजनक असल्याचेही नोटिसीत नमूद केले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या ३१ गावांतील पंचनाम्याचे अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात असून अजूनही बर्‍याच गावांतील पिकांचे पंचनामे करण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे.

पंचनामे तात्काळ सादर करावेतनुकसानीचे पंचनामे तात्काळ सादर करावेत, यासाठी तहसीलदारांनी १३ डिसेंबर रोजी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी बैठक घेऊन चार दिवसांच्या आता १८ डिसेंबरपर्यंत नुकसानीचा सर्वे सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. परंतु, १८ डिसेंबर रोजी चार दिवसांचा कालावधी लोटूनही पंचनाम्याचे अहवाल सादर करण्यात आले नसल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नुकसानीचा सर्वे करताना सातबारावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान व त्यापेक्षा कमी नुकसान तसेच क्षेत्र सर्व्हे नं. शेतकर्‍यांसह उभ्या पिकांचा फोटो शेतकर्‍यांची व पंचाची स्वाक्षरी तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसानीचा सर्व्हे सादर करण्याच्य सूचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :cottonकापूसHingoliहिंगोलीFarmerशेतकरी