शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर बीडीओंचे पगार बंद करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:09 IST

मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या मग्रारोहयोची कामे ५६३ पैकी २0८ ग्रामपंचायतीत सुरू आहेत. यात ५५२ कामांवर ८५२९ मजूर काम करीत आहेत. यात औंढ्यात २0 ग्रा.पं.च्या ४७ कामांवर ८५८, वसमतला २७ ग्रा.पं.च्या ५२ कामांवर ६९१, हिंगोलीत ५२ ग्रा.पं.च्या १२९ कामांवर २00१ मजूर, कळमनुरीत ५८ ग्रा.पं.च्या १७४ कामांवर २७१८ मजूर, सेनगावात ५१ गा.पं.च्या १५0 कामांवर २२६१ मजूर काम करीत आहेत. वन विभागाचीही औंढ्यात ५, हिंगोलीत ५, सेनगावात १३, कळमनुरी, वसमतला २ कामे सुरू आहेत. सामाजिक वनीकरणची वसमतला ५, कळमनुरीत ९ तर सेनगावात ४ कामे सुरू आहेत.यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही अनेक ग्रामपंचायतीत कामे होत नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतींनी ही कामे करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. जिल्ह्यात यंदा मग्रारोहयोच्या कामांवर दररोज दहा हजारांवर मजूर उपस्थिती गेली होती. आता त्यात घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीमुळे मजुरांची संख्या रोडावली होती. त्यानंतर आता उन्हाची तीव्रता वाढल्याचा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र हाताला काम नसलेल्यांना सकाळी व सायंकाळी काम करणे शक्य आहे.पाणंद रस्त्यांचीच कामे नकोग्रामपंचायतींना कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या म्हणून त्यांनी केवळ पाणंद रस्त्यांची कामेच सुरू करू नयेत. आधी जलसंधारणाची कामे पूर्ण केल्यानंतरच पाणंद रस्त्यांच्या कामांचा विचार करण्यास सांगण्यात आले आहे.पाच जणांना दणकावारंवार सूचना देवूनही कामे करीत नसलेल्या पाच कंत्राटी कर्मचाºयांना कामावरून कमी करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यास सांगण्यात आले. यात सेनगाव, हिंगोली व औंढ्यातील एक सहायक कार्यक्रम अधिकारी दोन तांत्रिक अधिकारी व दोन डाटा एन्ट्रि आॅपरेटरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती