शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वर्तनात सुधारणा होईना; तिघांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याबाहेर हाकलले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 12, 2023 15:19 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता.

हिंगोली: वर्तनात कोणतीही सुधारणा न करणाऱ्या व संघटितपणे गुन्हा करणाऱ्या तिघांना हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या बाबतचे आदेश काढले आहेत. 

रमेश उर्फ रामा सुरेश गायकवाड (रा. गणेशपूर ता. वसमत), अनिल उर्फ बंडू भागोराव खंदारे (रा.मुडी ता. वसमत), राजू संभाजी करवंदे (रा. मुडी ता. वसमत) असे हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध सेनगाव, कळमनुरी (जि. हिंगोली) , लिंबगाव (जि. नांदेड) पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असून ते संघटितपणे गुन्हे करीतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नव्हता. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव   उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्फत पोलिस निरीक्षक आर.व्ही. भोईटे यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तिघांनाही पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालकांसह टोळीने गुन्हेगारी करणाऱ्याविरूद्ध कारवाईची कडक भूमिका पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली