जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती
------
१०१३
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा
------
२६५
सुरू झालेल्या शाळा
--------
विद्यार्थ्यांची उपस्थिती
५३००
------
शिक्षकांची उपस्थिती
७९५
------
एकही बाधित नाही
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाने शिक्षकांच्या कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. शाळा सुरू झालेल्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेतल्या असून यात एकही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाला नसल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. त्यामुळे सध्या तरी विद्यार्थी सुरक्षित असल्याने पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत आहेत तसेच मुलांच्या हट्टापायी त्यांना सॅनिटायझरची बॉटलही घेऊन दिली जात आहे.
माझी शाळा सुरू झाली आहे. शाळेत जाताना मास्क वापरत असून शिक्षकही वारंवार कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना देत आहेत. आता बाबांनी सॅनिटायझरची बाॅटल घेऊ दिली आहे. त्यामुळे वारंवार हात स्वच्छ धुत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करत आहे.
- शर्वरी कावरखे, विद्यार्थिनी
कोरोना नियमांचे पालन करावे, अशा सूचना शिक्षक वारंवार करत आहेत. त्यानुसार दररोज मास्क वापरत असून आता सॅनिटायझर विकत घेतले आहे. शाळेत सॅनिटायझरचा वापर करत असून घरी साबणाने हात स्वच्छ धूत आहेत.
ऋतुराज वाढवे, विद्यार्थी
माझाी शाळा सुरू झाली असून वर्गात शारीरिक अंतराचे पालन करण्याच्या तसेच मास्कचा वापर करण्याच्या सूचना शिक्षक देत आहेत. ग्रामीण भागात सॅनिटायझर उपलब्ध नसले तरी साबणाने हात वारंवार स्वच्छ करत आहे.
सचिन कडेकर, विद्यार्थी