धांडे पिंपरीत माॅप - अप राऊंडमध्ये एकही कोंबडी आढळली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:30 AM2021-01-25T04:30:42+5:302021-01-25T04:30:42+5:30

आखाडा बाळापूर : बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी गावातील सर्व कोंबड्या ...

No chickens were found in the map-up round at Dhande Pimpri | धांडे पिंपरीत माॅप - अप राऊंडमध्ये एकही कोंबडी आढळली नाही

धांडे पिंपरीत माॅप - अप राऊंडमध्ये एकही कोंबडी आढळली नाही

googlenewsNext

आखाडा बाळापूर : बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी गावातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी गावात माॅप - अप राऊंड घेऊन पक्ष्यांची तपासणी केली. परंतु या माॅप -अप राऊंडमध्ये एकही कोंबडी, पक्षी आढळले नाहीत. दया मरणानंतर कोंबड्या दान केलेल्या जागेवर पशुसंवर्धन विभागाने 'बर्ड फ्लू प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित केले असून, त्या भागात नागरिकांना फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे.

कळमनुरी तालुक्यातील धांडे पिंपरी खु. येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे भोपाळ येथील प्रयोगशाळेच्या अहवालाने सिद्ध केले. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग व सर्वच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध समित्या गठीत करून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २२ जानेवारी रोजी शंभर ते दीडशे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने गावात सर्वत्र फिरून १८७ कोंबड्यांना दयामरण दिले. त्यानंतर २३ जानेवारी रोजी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. माधव आठवले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रणिता पेंडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाने धांडे पिंपरी गावात भेट देऊन माॅप - अप राऊंड घेतला. प्रत्येक घरी खुराडे व जनावरांच्या गोठ्यात तपासणी करून कोंबड्या, पक्षी शिल्लक आहेत का? याची चाचपणी केली. माॅप -अप राऊंडमध्ये एकही पक्षी, कोंबडी आढळली नसल्याचे डॉ. माधव आठवले यांनी सांगितले आहे.

त्यानंतर दयामरण दिलेल्या कोंबड्यांना दफन केलेल्या जागेवर काट्या, लाकडे रचून तेथे पशुसंवर्धन विभागाचा फलक गाडण्यात आला. ही जागा 'बर्ड फ्लू प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आली आहे. या भागात नागरिकांनी, मुलांनी कुणीही फिरू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यानंतर गावातील खुराडे, गोठे यांची पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फवारणी केली आहे. निर्जंतुकीकरण केले आहे. एकंदरीत गेल्या तीन दिवसांपासून धांडे पिंपरी गाव मराठवाड्यात चर्चेत आले असून, कोंबड्यांच्या रोगांची साथ आणि प्रशासनाची तत्परता यांचा अनोखा प्रयोग ग्रामस्थांना पाहायला मिळाला आहे. फाेटाे नं. ३६

Web Title: No chickens were found in the map-up round at Dhande Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.