शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वामनदादांच्या सहकाऱ्याच्या पदरी उपेक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 6:09 AM

जगण्यासाठी ८५ व्या वर्षीही संघर्ष

बालय्या स्वामीलोकमत न्यूज नेटवर्क कौठा (जि. हिंगोली) : ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन करून साऱ्या देशभर भीमगीतांनी समाजप्रबोधन करणाऱ्या शाहीर वामनदादा कर्डक यांना साथसंगत करत जनजागृतीच्या कार्यात सहभागी असणाऱ्या टाकळगाव येथील भीमशाहिराला  आज मात्र हलाखीचे जीवन जगत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उमाकांत कांबळे हे या भीमशाहिराचे नाव. वयाच्या ८५ वर्षी उमाकांत कांबळे यांच्यावर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे वास्तव्यास असलेल्या उमाकांत कांबळे यांनी बालपणापासूनच हार्मोनियम, तबला व ढोलकी वाजविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यावर शाहीर वामनदादा कर्डक यांचा मोठा प्रभाव पडला. वामनदादांच्या प्रत्येक कार्यक्रमास ते आर्वजून उपस्थित असत.  एकदा नाशिक जिल्ह्यात तळवडी येथे खुद्द वामनदादांच्या एका कार्यक्रमात वादन करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर त्यांनी वामनदादांसोबत भारतभर कार्यक्रम केले. भीमगीतांच्या आवडीमुळे उमाकांत कांबळे या क्षेत्रात रमले. ‘रण मैदानी लढणारा सुरा होता, बुद्ध आणि भीमगीतांच्या शिवाराचा धुरा होता, वामनदादा म्हणजे शाहिरीचा तुरा होता...’, असे उमाकांत कांबळे अभिमानाने सांगतात. मात्र आता जमाना बदलला. शाहिरीचे कार्यक्रम जवळपास बंद झाले. मोबाइलच्या जमान्यात जुन्या कलावंतांचे अस्तित्वच शून्य झाले, याची खंत कांबळे यांना वाटते. एकेकाळी भीमशाहीर म्हणून असलेला नावलौकीक आता उदरनिर्वाहाच्या कामी येत नसल्याचे शल्य कांबळे यांच्या बोलण्यातून जाणवते. 

उदरनिर्वाहासाठी धार लावण्याचे काम nउमाकांत कांबळे यांना दोन मुले असून ते मजुरी, व्यवसाय करतात. पूर्वीपासूनच स्वाभिमानाने जगण्याची धडपड असल्याने आज वयाच्या ८५ व्या वर्षीही ते मेहनतीवर जीवन जगत आहेत. nजवळपास असलेल्या खेडेगावात विळे, कात्री यांना धार लावण्याचे काम ते सायकलवर फिरून करतात. शासनाने आमच्यासारख्या कलाकार मंडळीकडे लक्ष देऊन जगण्याची नवी उमेद देण्याची गरज असल्याचे भीमशाहीर कांबळे सांगतात.