शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

संपता संपेना औंढा बसस्थानकाची दैना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:08 IST

ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखल होत असल्याने अजूनही भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. परिवहन मंडळाने यासाठी पाचवेळा कामाचे सर्वेक्षण करूनही नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रवाशांसह भाविक संताप व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देभाविकांना होतोय त्रास : अजूनही काढावा लागतो घाणीतूनच मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखल होत असल्याने अजूनही भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. परिवहन मंडळाने यासाठी पाचवेळा कामाचे सर्वेक्षण करूनही नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रवाशांसह भाविक संताप व्यक्त करीत आहेत.औंढा नागनाथ येथे परिवहन विभागाने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून जुने बसस्थानक बंद करून मंदिराच्या एकदम समोरासमोरच सन २००६ साली नवीन अद्ययावत बसस्थानक बांधकाम करून सोय करून दिली. येथे राज्यातून नाही तर संपूर्ण देशातूनच भाविक ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येतात. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे काही वर्षे चांगली गेली; परंतु मंदिराच्या व बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासूनच अतिक्रमण झाले. त्यामुळे गावातील सांडपाण्यासाठी बांधलेल्या नाल्या बुजूनच टाकण्यात आल्या. नालीतून वाहणारे पाणी हे हिंगोली-परभणी राज्य रस्त्यावरून वाहू लागले. पर्यायाने या घाण पाण्याला दुसरीकडे जाण्याचा मार्गच नसल्याने थेट पाणी बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारातून बसस्थानकातून वाहत आहे. याबाबत सा.बां. विभागाकडे अनेकवेळा मागणी होवूनही काम होत नसल्याने संस्थानच्या वतीने स्वत: निधी खर्च करून मंदिराकडे येणाºया मार्गात सुधारण केली तसेच सा.बां.ने उशिरा का होईना बसस्थानकाला लागून नालीचे बांधकामास सुरूवात केली; परंतु सदरील कामाची देयकेच कंत्राटदारांना न मिळाल्याचे कंत्राटदार दोनवेळा अर्धवट काम सोडून निघून गेला. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला. त्यामुळे बसस्थानकात येणाºया पाण्याची समस्या मात्र सुटली नाही. बसस्थानकाचे वाहनतळ खोल झाले व रस्त्यांची उंची वाढल्याने परिवहन मंडळाने येथील वाहन तळाचेच काम करण्यासाठी पाचवेळा सर्वे केला आहे. याचे अंदाजपत्रकही तयार झाले. निधीही उपलब्ध झाला; परंतु प्रत्यक्षात कामच होत नाही. त्यामुळे येथे येणाºया प्रवासी व वाहनांना घाण पाण्यातूनच रस्ता काढावा लागत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBus Driverबसचालक