शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही; जिल्ह्यात १५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

म्युकरमायकोसिस हा दुर्मीळ आजार आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर आक्रमण करीत आहे. यात मधुमेह, स्टेरॉईडचा ...

म्युकरमायकोसिस हा दुर्मीळ आजार आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर आक्रमण करीत आहे. यात मधुमेह, स्टेरॉईडचा मारा, ऑक्सिजन जास्त काळ लागणे, या प्रकारामुळे कोरोना रुग्णांत म्युकरमायकोसिस दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत १५ रुग्ण आले आहेत. मात्र, खासगीमध्ये उपचार घेणारेही याच्या तीनपट असण्याची शक्यता आहे. फंगस स्टेन चाचणी येथे होत नसल्याने अनेकजण थेट नांदेड किंवा औरंगाबादचा रस्ता धरत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नंतर नोंदी होत नाहीत. कोरोनासारखा हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी या आजाराला घाबरण्याचे तेवढे कारण नाही. फक्त रुग्ण हाताळताना किंवा रुग्णांनीही इतर वस्तू हाताळताना ग्लोव्हजचा वापर केल्यास अधिक चांगले. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णावर वेळीच उपचार होतील, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

औषधींचा पुरेसा साठा कधी मिळणार?

हिंगोली जिल्ह्यात म्युकरमायकोसिसवर खासगी रुग्णालयांमध्ये अजून कुणीही उपचार करीत नाही. कारण बाजारपेठेत त्यासाठीची आवश्यक औषधी नाही. जिल्हा रुग्णालयातही ॲम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचे ४० व्हायल होते. आता २३० नवीन आले. एका रुग्णाला २० ते ४० इंजेक्शन लागतात. त्यामुळे पुरेशा प्रमाणात औषधी कधी येणार, हा प्रश्न आहे.

ही घ्या काळजी

मधुमेह असलेल्यांनी कोरोनानंतर तीन ते पाच आठवड्यांनी एकदा म्युकरमायकोसिसच्या धर्तीवर तपासणी करून घ्यावी, तर मधुमेह नसलेल्यांनी बिटाडिन गार्गलने गुळण्या कराव्यात. तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी करावी.

म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे

म्युकरमायकोसिसच्या प्राथमिक लक्षणांत डोळ्याखाली सूज येणे, टाळूमध्ये सूज येणे, जबड्यांत पू भरणे अथवा प्रचंड वेदना होणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. याशिवाय शिंकल्यावर नाकातून काळा मळ तसेच काळे बेडके पडणे ही लक्षणेही दिसू शकतात.

डॉक्टर काय म्हणतात ?

म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. वेळेत उपचार घेतल्यास त्यापासून धोकाही नाही. दात, जबडे, डोळ्याखाली सूज दिसताच तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

- डॉ. फैसल खान, मुख शल्यचिकित्सक

म्युकरमायकोसिसबाबत आता बऱ्यापैकी जागरूकता आली. हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र, कोरोनानंतर डोळ्यांची जराही समस्या झाली तरीही रुग्ण दाखवायला येत आहेत. मात्र, कुणी बाधित आढळला नाही.

- डॉ. किशन लखमावार, नेत्रतज्ज्ञ

म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे दिसणारे रुग्ण आढळत आहेत. हा संसर्गजन्य आजार नाही. घाबरून न जाता वेळेत उपचार करून घेतले पाहिजेत.

- डॉ. यशवंत पवार, फिजिशियन

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिचे रुग्ण १५

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील मृत्यू १

जिल्हा रुग्णालयात आता नव्याने कोरोनाचे १० बेड तयार केले आहेत. या ठिकाणी रुग्णांसाठी सर्व सुविधांनी युक्त व्यवस्था केली जाणार आहे.