शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आईची बाजू घेतो म्हणून १४ वर्षीय मुलाचा खून; आरोपी पित्यास आजन्म कारावासाची शिक्षा

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: March 5, 2025 19:34 IST

न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा भाव दिसून येत नव्हता.

हिंगोली : नेहमी आईची बाजू का घेतो, याचा राग मनात धरून १४ वर्षांच्या मुलाला झोपेतून उठवून त्याचा खून करणाऱ्या आरोपी पित्याला हिंगोली येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज एम. माने-गाडेकर यांनी आजन्म कारावास आणि ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ५ मार्च रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.

बाबुराव भगवानराव शिखरे असे आरोपी पित्याचे नाव आहे. २८ डिसेंबर रोजी रात्री ९ ते २९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात अरविंद गणेशराव शिखरे यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कलम ३०२, २०१ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे व व्ही.एम. केंद्रे यांनी तपास केला. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते.

जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज एम. माने-गाडेकर यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण चालले. सहायक सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी १४ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश सरोज एम. माने-गाडेकर यांनी आरोपी बाबुराव शिखरे यास कलम ३०२ भा.दं.वि. अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये दंड आणि पुरावा नष्ट केला म्हणून भा.दं.वि. २०१ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड सुनावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एन.एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एस.डी. कुटे, एस.एस. देशमुख, कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक टी.एस. गुहाडे, सुनीता धन्वे यांनी सहकार्य केले.

न्यायिक जिल्ह्यातील पहिला निकाल२२ फेब्रुवारी २०२५ रोजी हिंगोली जिल्ह्याला स्वतंत्र न्यायिक जिल्ह्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात आजन्म कारावासाची ही पहिलीच शिक्षा ठरली आहे. आरोपीचे कृत्य हे अतिशय निंदनीय आहे. त्याने स्वत:च्या मुलाचा निर्घृण खून केला, असे मत नोंदवून न्यायालयाने शिक्षा सुनावली. तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा भाव दिसून येत नव्हता.

अशी घडली होती घटनाकळमनुरी तालुक्यातील येडशी येथील बाबुराव भगवानराव शिखरे (वय ३५) याने २८ डिसेंबर रोजी रात्री ९ ते २९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान हा प्रकार केला. आरोपी बाबुराव शिखरे याने त्याचा मुलगा वैभव (वय १४) यास झोपेतून उठवून ऑटोमध्ये बसवत कुंभारवाडी शिवारातील कुरतडी पाटीच्या पश्चिमेस रस्त्यावर नेले. त्यानंतर सुताच्या दोरीने वैभवला गळफास देऊन त्यास मारहाण केली. तरीही वैभव हा हालचाल करीत असल्याने व तो मृत पावला नसल्याने आरोपी बाबुराव शिखरे याने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड डोक्यात मारून त्यास ठार केले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वैभव याचे प्रेत परत येडशी गावात आणून अरविंद गणेशराव शिखरे यांच्या घरासमोरील पायऱ्यावर टाकून दिले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय