शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या किडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या'; हतबल शेतकऱ्यांनी बँकेकडे केली मागणी

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: May 3, 2024 18:41 IST

दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र

- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली): यंदा निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शासन आदेश असूनही बँकांकडून पीककर्ज पुनर्गठन केले जात नाही. तेव्हा खत, बियाणे खरेदी व खरिपाच्या पेरणीचा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे. यामुळे आमच्या किडन्या गहाण ठेवून पीककर्ज द्या, अशी मागणी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांकडून ३ मे रोजी लेखी निवेदनाद्वारे बँक शाखाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

गत खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. तर रब्बी हंगामातही अवकाळीच्या घाल्यामुळे पिकांची नासाडी झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना उत्पन्न घटीचा दुहेरी फटका सहन करावा लागला आहे. एकंदरीत निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आर्थिक कंगाल झाल्याचे चित्र आहे. अगोदरच पीक कर्जापायी शेतजमिनी बँकांकडे गहाण असल्याने बँक कर्ज देईना. दुष्काळ परिस्थितीत पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचे शासन आदेश असताना पुनर्गठन ही करण्यास नकार दिला जात आहे. तेव्हा पुढील खरीप हंगामासाठी खत बी-बियाणे खरेदी व पेरणीचा खर्च भागवायचा कसा ? असा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांनी दिले बँक शाखाधिकाऱ्यांना निवेदन...आमच्या किडन्या गहाण ठेवून किंवा विकत घेऊन आम्हाला ‘ पीककर्ज द्या’ अशी मागणी गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी ३ मे रोजी गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर संगीता पतंगे, दसरथ मानमोठे, पांडुरंग मानमोठे, विनायक कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, विजय कावरखे, रामराव पतंगे, विकास सावके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जHingoliहिंगोलीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र