शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोंढा, हळद मार्केटयार्ड बंद; तुमचा झाला मार्च एंड, पण शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा कुठे?

By रमेश वाबळे | Updated: March 28, 2024 19:09 IST

खुल्या बाजारात भाव पडले, शेतकऱ्यांची होतेय लूट

हिंगोली : येथील बाजार समितीने होळी, धूलिवंदन आणि मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून मोंढा व हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. २ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यानच्या काळात मात्र शेतकऱ्यांनी माल विकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खुल्या बाजारात भाव पाडण्यात येत असून, शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.

हिंगोली बाजार समितीचे संत नामदेव हळद मार्केट यार्ड मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. गत आठवड्यापासून शेतकऱ्यांकडे हळद उपलब्ध झाली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हळद विक्री करणे गरजेचे आहे. परंतु, २२ मार्चपासून होळी, धूलिवंदन आणि आता मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड बंद असल्यामुळे खुल्या बाजारात हळद विक्री करण्याची वेळ येत आहे. या बाजारात मात्र व्यापाऱ्यांनी मनमानी सुरू असून, पडत्या भावात हळदीची मागणी होत आहे.

बाजार समितीच्या मार्केट यार्डात १६ ते १९ हजारांदरम्यान भाव मिळत होता. खुल्या बाजारात मात्र १२ ते १४ हजार रुपये क्विंटलने हळदीची खरेदी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांची लूट होत असून, आर्थिक फटका बसत आहे. परंतु, आर्थिक निकडीमुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हळद विक्री करावी लागत आहे. अशीच परिस्थिती हरभरा, तूर, गव्हाचीही असून, पडत्या भावात शेतमालाची मागणी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार समितीचा मोंढा, हळद मार्केट यार्ड सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

३ एप्रिल रोजी मोंढ्यातील व्यवहार होणार सुरळीत...बाजार समितीच्या वतीने होळी, धूलिवंदन आणि आता मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मोंढ्यातील भुसार शेतमालासह मार्केट यार्डात हळद खरेदी- विक्रीचे व्यवहार २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आले आहेत. आता ३ एप्रिल रोजी व्यवहार सुरळीत होणार आहेत. या दिवशीपासून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणता येणार आहे.

खुल्या बाजारात मनमानी...मोंढा, हळद मार्केट यार्ड बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात शेतमाल विक्री करावा लागत आहे. या संधीचा फायदा व्यापारी उचलत असून, पडत्या भावात शेतमालाची मागणी होत आहे. गेल्या आठवड्यात मार्केट यार्डात १६ ते १९ हजारांदरम्यान हळद विक्री झाली असताना खुल्या बाजारात मात्र १२ ते १४ हजार रुपयांवर हळदीला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

हळद मार्केट यार्डात शुकशुकाट...बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्ड शेतकरी, खरेदीदार, आडते, हमाल, मापाऱ्यांनी गजबजलेले असते. व्यवहार बंद असल्याने मात्र मार्केट यार्डात गुरुवारी शुकशुकाट होता. तर मार्केट यार्ड, मोंढा कधी सुरू होणार, अशी विचारणा करण्यासाठी शेतकरी येत होते.

मोंढा, हळद मार्केट यार्ड सुरू होण्याची प्रतीक्षा...हरभरा, हळद उपलब्ध झाली आहे. परंतु, मोंढा, हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे खुल्या बाजारात माल विक्री करावा लागत आहे. या बाजारात पडत्या भावात मागणी होत असून, एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट होत आहे. त्यामुळे बाजार समितीने मोंढा, हळद मार्केट यार्डातील व्यवहार लवकर सुरू करणे गरजेचे आहे.- प्रकाश जोजार, शेतकरी

व्यवहार लवकर सुरळीत करावेतगेल्या आठवड्यात बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीला १९ हजारांपर्यंत भाव मिळाला. परंतु, सध्या तेथील व्यवहार बंद असल्यामुळे खुल्या बाजारात पडत्या भावात शेतमालाची विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बाजार समितीने मोंढ्यातील व्यवहार लवकर सुरळीत करावेत.- शिवाजी साबळे, शेतकरी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली