शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:43 IST

राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतील का? या अनुषंगाने मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन समादेशक नामदेव मिठ्ठेवाड हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. भरती घोटाळा प्रकरणात आणखी काही धागेदोरे लागतील का? या अनुषंगाने मिठ्ठेवाड यांची कसून चौकशी सुरू आहे.हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्र. १२ पोलिस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आले होते. त्यानंतर हिंगोली शहर ठाण्यात तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम पुष्ठपाटे, सूत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस.एस.जी. सॉफ्टवेअर कंपनीचे आॅपरेटर शिरीष औधूत, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा व गुण वाढवून सेवेत समाविष्ट होणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला. मदणे यांनी सदर प्रकरणाचा कसून तपास करत भरती घोटाळा प्रकरणातील आरोपी पोलिसांना कर्तव्यावरून ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यामुळे अनेक उलगडे झाले. विशेष म्हणजे डीवायएसपी राहुल मदने यांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक व माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. अर्थपूर्ण चिरीमिरीतूनच ही भरती झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. उत्तर पत्रिका व संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर मदने यांनी मिठ्ठेवाड यांना अटक केली. मिठ्ठेवाड यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांची दिवसभर डिवायएसपी मदने यांच्या दालनात चौकशी केली जात आहे. तर रात्रीच्या सुमारास हिंगोली शहर ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले जात आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच चौकशी सुरू असून काही बाबी स्पष्ट झाल्या असल्या तरीही अद्याप महत्त्वाचा धागा-दोरा हाती लागला नाही, असे डीवायएसपी मदने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर फुटले होते बिंग...हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस भरती २०१३, २०१४ व २०१७ या कालावधीत उमेदवारांना निकष डावलून पोलीस भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले होते. या पोलीस भरतीचे बिंग फुटले अन् घोटाळा समोर आला. नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर हिंगोलीतही हा घोटाळा झाल्याने या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :PoliceपोलिसForceफोर्स