शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे. परंतु यावर मात करून कांडली येथील शेतकºयाने दूध विक्रीची बाजारपेठ बाळापुरात उभी केली आहे. ग्राहकांचा विश्वास मिळवला. अर्ध्या तासातच दूध विकून रोख रक्कम मिळत असल्याने आता परिसरातील शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाले आहेत. नव्या बाजारपेठेचा फंडा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे. शेतकºयांना या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी शेतीपूरक जोडधंदा करावा, असा सल्ला सर्वजण देतात. मात्र जोडधंदा करूनही दारिद्र्य दूर होईना हा सर्वांचाच अनुभव आहे. कळमनुरी तालुक्यातील शेतकरी यशवंत नरवाडे यांना सहा एकर शेती आहे. जोडधंदा म्हणून त्यांना म्हशी राखल्या दररोज ८ ते १० लिटर एकवेळ दूध येई. ते डेअरीला दूध देत, परंतु डेअरीवाले दूध फुटले या कारणाने आठवड्यातून एक दिवस तरी खाडा धरायचे त्यामुळे फायदा व्हायचा नाही. या बाबीला वैतागून त्यांनी बाळापुरातच दूध विकण्याचा निर्णय घेतला. शेवाळा रोड चौकात एका टेबलवर दुधाची कॅन ठेवून बसत. परंतु ग्राहक मिळेना. त्यांचे बसणे हा टिंगलीचा विषय बनला. अनेकवेळा दूध परत न्यावे लागले. हॉटेलवाले इतर दूध विक्रेते भाव पाडून मागायचे; पण या कशालाच दाद न देता त्यांनी नियमीत बसणे सुरू ठेवले. हळूहळू या निक्क्या दुधाची चर्चा सुरू झाली. पाण्याचा थेंबही न मिसळलेले दूध अशी ख्याती झाली. चांगले दूध मिळवण्यासाठी ग्राहक थेट चौकात येवू लागले. मोठ्या कष्टाने, धीराने ग्राहकांना विश्वास देवून ही बाजारपेठ निर्माण केली. हळूहळू ग्राहक वाढले. दूध कमी पडू लागल्याने इतर शेतकºयांना बोलावले. शेतकरी वाढले. आता बाळापूर, कांडली, बऊर, आडा येथील शेतकरी दूध विकतात. अर्ध्या तासातच १५० ते २०० लिटर दूध नगदीने विकले जाते. ५० रुपये लिटरप्रमाणे रोख पैसा काही मिनिटातच शेतकºयांच्या खिशात पडतो.परिसरातील पाच ते सहा शेतकºयांच्या १५० ते २०० लिटर दुधाची दररोज विक्री होते. शेतकºयांना दररोज रोख पैसे यातून मिळतात. गेल्या दीड वर्षांपासून ही थेट बाजारपेठ तयार झाली. शेतकरी या बाजारपेठेकडे आकर्षित झाल्याने येथील डेअरी बंद करावी लागली आहे.ही थेट बाजारपेठ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.मला केवळ ६ एकर शेती आहे. १२ म्हशी, ८ बछडे आहेत. दररोज एक वेळा २० लिटर असे ४० लिटर दूध निघते. पण डेअरीवाल्यांची चलाखी आम्हाला नफा मिळू देत नव्हती. म्हणून थेट ग्राहकांशीच नाळ जोडली. २ ते ३ महिने नुकसान झाले. पण ग्राहकांना विश्वास पटला. आता रोज १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये रोख मिळतात. विश्वासावरच हा व्यवसाय उभारला. ग्राहकांना डेअरी किंवा पॅकिंगच्या दुधापेक्षा चांगले दूध मिळत असल्याने ग्राहक इकडे आकर्षित झाले आहेत, असे कांडली येथील सदर शेतकरी यशवंत नरवाडे यांनी सांगितले.आधी डेअरीला जाणारे दूध शेतकरी आता या बाजारपेठेत विकत असल्याने डेअरीला दूध जाणे बंद झाले. शिवाय ग्राहकही इकडे वळल्याने डेअरीचा व्यवसाय बंद पडल्याचे दिसून येत आहे.

 

 

शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकऱ्याची असते, मात्र त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmilkदूध