शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 13:08 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला

कळमनुरी ( हिंगोली ) : हिंगोली - नांदेड मुख्य रस्त्यावर आयटीआय जवळ एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील दोघे मित्र ठार झाल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.

कळमनुरी येथील शेख फैजान शेख उमर फारूक ( २२ ) , उमेर कुरेशी (१८ ) हे दोघे मोटरसायकलने माळेगाव येथून चहा पिऊन कळमनुरीकडे येत होते. आयटीआयजवळ ते आले असता, त्यांच्या वाहनाला विना क्रमांकाच्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात शेख फैजान, उमेर कुरेशी हे दोघे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच, काही युवक व त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. त्यांना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, शेख फैजान यांना डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. तर उमेर कुरेशी हा गंभीर जखमी असल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. नांदेड येथे जात असताना अर्धापूर येथे त्याचाही मृत्यू झाला. 

या घटनेचा पोहेका. माधव भडके, गुलाब जाधव यांनी पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत शेख फैजान हा आई-वडिलांना एकटाच होता. या दोघावर ५ जानेवारी रोजी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली