शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
3
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
4
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
5
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
6
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
7
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
8
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
9
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
10
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
11
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
12
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
13
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
14
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
15
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
16
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
17
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
18
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
19
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
20
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा

विषय समिती सदस्य; २८ रोजी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST

परभणी : येथील जिल्हा परिषदेतील ९ विषय समित्यांच्या सदस्यांची २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता जि.प.च्या सभागृहात निवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ११६२ शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेततळ्याच्या कामावर २ कोटी ७५ लाखांचा खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाग्यावरच सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात शेतकऱ्यांना ३ हजार शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागानेही गावा-गावात जावून कृषी सहाय्यकांमार्फत मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार आणि प्रचार केला. याचे फलित म्हणून पूर्णा तालुक्यातून ४१९, पालम २२०, सेलू ४५९, परभणी ७३८, जिंतूर ९८९, मानवत ४३१, गंगाखेड ७३७, पाथरी ५१२, सोनपेठ २९२ असे एकूण ४ हजार ८०५ अर्ज मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यामधून कृषी विभागानेही छाननी करुन ४ हजार ७१७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर केले. आतापर्यंत यातील पूर्णा तालुक्यात १००, पालम ४३, सेलू ११६, परभणी २१५, जिंतूर ३०५, मानवत १६२, गंगाखेड १४०, पाथरी ४६ आणि सोनपेठ ३५ अशा एकूण ११६२ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४२ शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी कृषी विभागाकडून ३० बाय ३० शेततळ्यासाठी ५० हजार रुपये या प्रमाणे अनुदानही देण्यात येत आहे. त्यामुुळे शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात पावसाच्या पाण्यातून सिंचनाची सोय निर्माण व्हावी, या हेतूने शेततळे घेतले. २०१६-१७ या एका वर्षात ११६२ शेततळे पूर्ण झाले आहेत.यासाठी कृषी विभागाने २ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदानही लाभार्थ्यांना वाटप केले आहे. शेतकऱ्यांनीही या योजनेअंतर्गत शेततळे घ्यावे, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.