शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

श्रद्धेची चिकित्सा करा म्हणजे तिचे अंधश्रद्धेत रुपांतर होणार नाही - श्याम मानव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 15:34 IST

बुवा-बाबांच्या चमत्कारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. शिवाय श्रद्धेची चिकित्साही करणे तितकेच महत्त्वाचे असून श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतरण होऊ देऊ नका असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.

ठळक मुद्देयावेळी प्रा. श्याम मानव यांनी वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया या विषयावर उपस्थितांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

हिंगोली : बुवा-बाबांच्या चमत्कारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने डोळस श्रद्धा ठेवावी. शिवाय श्रद्धेची चिकित्साही करणे तितकेच महत्त्वाचे असून श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतरण होऊ देऊ नका असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक प्रा. श्याम मानव यांनी सोमवारी आयोजित व्याख्यानात व्यक्त केले. यावेळी सुरेश जुरमुरे, पुरूषोत्तम आवारे, मनोज आखरे, पोनि मारोती थोरात, जयाजी पाईकराव, विजय कांबळे, प्रकाश मगरे, शरद वानखेडे, महमंद मजहर, धम्मपाल कांबळे, दत्ता तपासे, मोरे यांच्यासह मान्यवर व समितीचे पदाधिकारी तसेच हिंगोली शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंगोली शाखेचे वतीने सोमवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा. श्याम मानव यांनी ' वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया ' या विषयावर उपस्थितांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले. प्रा. मानव म्हणाले आचार्य अत्रे यांच्या शिर्षकाखाली म्हणजेच वृक्ष तेथे छाया व बुवा तेथे बाया हे वाक्य आजच्या काळात शंभर टक्के लागू होत आहे. अंधश्रद्धेतून सर्वसामान्यांची लुबाडणूक होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली आंधळे भक्त बुवाबाबांच्या नादी लागत आहेत. त्यामुळे अनेक नव-नवीन बाबांचा अवतार निर्माण होताना दिसत आहे. गुलाबबाबा, शुकदास महाराज, सत्यसाईबाबा यासह अनेक महाराज व बाबांची खरी माहिती उघड करून ते कशाप्रकारे चमत्कार करत असत हे त्यांनी प्रात्येक्षिकासह करून दाखविले. त्यामुळे श्रोतेही आवाक् झाले होते. हवेत हात फिरवून चमत्कार करून सोन्याच्या वस्तू आकाशातून आणणा-या ढोंगी बाबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान जातात ही मोठी शोकांतिका असल्याचे मानव म्हणाले. 

चमत्कार करा, २५ लाखांचे बक्षीस मिळवा देवा-धर्माच्या नावावर महिलांचे शोषण केले जाते. त्यांचा उपभोग बाबा व महाराज घेत असून याला आळा बसावा व फसवेगिरी करणा-यांविरूद्ध अंनिस भारतभर जादुटोणाविरोधी कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवित आहे. समितीसमोर कोणीही चमत्कार करून दाखवावा व २५ लाखांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान  दिले होते. परंतु कुणीही आमच्यासमोर आला नाही, चमत्कार करण्याचे धाडस केले नाही. कारण तोच फसवेगिरी करून समाजाला लुबाडणारा होता. त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता श्रद्धेची चिकित्सा करण्याचे आवाहन यावेळी मानव यांनी केले.