बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळमनुरीत भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:35 AM2017-11-20T00:35:34+5:302017-11-20T00:35:45+5:30

येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर रोजी शहरातून काढलेल्या मिरवणुकीतील देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले.

 Massive procession in front of Birsa Munda Jayanti | बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळमनुरीत भव्य मिरवणूक

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळमनुरीत भव्य मिरवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर रोजी शहरातून काढलेल्या मिरवणुकीतील देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले. जि.प. प्रशालेच्या मैदानावर मार्गदर्शन मेळावा ही घेण्यात आला.
शहरातील सामाजिक सभागृह येथून मिरवणूक निघून जि.प. प्रशालेच्या मैदानावर पोहचली. मिरवणूकीत हजारो आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. मिरवणूकीत अश्वारुढ, प्रतिकात्मक बिरसा मुंडा व समृहनृत्यही सर्वांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीनंतर प्रशालेच्या मैदानावर झालेल्या मेळाव्याचे उद्घाटन आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रज्ञाताई सातव, डॉ. सतीष पाचपुते, रामराव वाघडव, वंदना टारफे, चंद्रकांत डुकरे, गारोळे, शामराव कांबळे, बबन डुकरे, लक्ष्मण कुरूडे, खुडे, शंकर शेळके, मारोतराव बेले, संजय काळे, श्रीराम किरवले, काळुराम कुरूडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघातर्फे केले होते. मार्गदर्शक शाम मुडे यांनी मेळाव्याला समाजप्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. पाचपुते यांनी, सूत्रसंचालन श्रीराम किरवले तर आभार बबन डुकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नागोराव खुडे, भारत धनवे, भगवान पाचपुते, राहूल इंगळे, राहूल मुकाडे, दत्तराव काळे, रंगराव रिठ्ठे, विजय क-हाळे, पप्पू क-हाळे, आनंद बुरकुले, राजू काळे, नारायण क-हाळे, किरण भुरके आदींनी परिश्रम घेतले.
तसेच शासनाकडून आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना सर्वसामान्य आदिवासीपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आपण सर्व आदिवासी योजनांचा पाठपुरावा करणार असल्याचे आ.डॉ. टारफे यांनी मेळाव्यात सांगितले. तर महापुरूषांचे जीवनचरित्र वाचन त्यांच्या जीवनाचे अनुसरण करावे, आदिवासी समाज बांधवांनी शिक्षणाची कास धरावी, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाने समाजाचा विकास शक्य असून प्रत्येकाने व्यवसाय शिक्षणावर भर देण्यास सांगितले.

Web Title:  Massive procession in front of Birsa Munda Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.