शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

वसमत येथे बाजार उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:29 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या वसमत येथे महाराष्टÑ बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. बंदचे अवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही युवकांवर दगडफेक झाली. त्यात दोन युवक जखमी झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. आठवडी बाजार भरला असताना जमाव बाजारात आल्याने बाजारातही गोंधळ होवून बाजार बंद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या वसमत येथे महाराष्टÑ बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. बंदचे अवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही युवकांवर दगडफेक झाली. त्यात दोन युवक जखमी झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. आठवडी बाजार भरला असताना जमाव बाजारात आल्याने बाजारातही गोंधळ होवून बाजार बंद झाला.वसमत तालुक्यात सर्वत्र बंद पाळला गेला. वसमत आगारातून एकही एसटी बाहेर पडली नाही. बंदचे आवाहन करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शहरात बाजारपेठ कडकडीत बंद होती मोंढा भागात बंद असलेल्या शटरवर दगडफेक झाली. पारसमल जैन यांच्या इमारतीच्या काचा फोडल्या. सहस्त्रार्जुन पतसंस्थेवर दगडफेक झाली काचा फुटल्या. एसटी आगारातील पासेस आॅफिसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. वसमत बसस्थानकात वृत्तपत्र विक्री करत असलेल्या प्रदीप पोतकर यांच्या वृत्तपत्र विक्री केंद्रावर दगडफेक झाली.यात प्रदीप पोतकर जखमी झाले, कौठा रोड भागातील शेख हकीम शेख सलीम हे दगडफेकीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. महाराष्टÑ बंदच्या हाकेला वसमत तालुक्यात अनुभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला.बाळापुरात बंदमुळे बाजारावर परिणामलोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बाळापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले. आंदोलकांनी शेवाळा रोड येथे जमून रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. जुने बसस्थानकाजवळ या प्रेताला आंदोलकांनी भडाग्नीही दिला. या कडकडीत बंद व आंदोलनामुळे येथील आठवडी बाजार बंद झाल्याने भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना माल घेऊन परतावे लागले.आखाडा बाळापूर येथील शेवाळा रोड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन ते तीन तास आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून होते. या आंदोलनात संजय बोंढारे, डी.के.दुर्गे, कृष्णराव पाटील जरोडेकर, देवराव पाटील, जकी कुरेशी, असद कादरी, विठ्ठल पंडित, धनंजय सूर्यवंशी, डॉ. संतोष बोंढारे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. दुर्गे यांची उपस्थिती होती. गोपाल बोंढारे यांनी सूत्रसंचालन केले तर अनेकांनी भाषणे करून आपल्या तीव्र भावना मांडल्या. बाळापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले. आठवडी बाजारचा दिवस असल्याने खेड्यापाड्यातून शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. पण बंद पाहून त्यांना माल घेऊन परत जावे लागले. कांडली फाटा येथे आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले. कामठा फाटा येथेही आंदोलकांनी रास्ता रोको केले. मयत काकासाहेब शिंदे या आंदोलकास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर मराठा समाजातील आमदारांना श्रद्धांजली अर्पण केली. तर येहळेगाव तुकाराम रस्त्यावरही टायर जाळून व झाडे तोडून टाकत रास्ता रोको आंदोलन केले.मराठा आरक्षणासाठी कळमनुरीत उत्स्फूर्त बंदलोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने २४ जुलै रोजी कळमनुरी बंदचे आवाहन केले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कळमनुरी शहर कडकडीत बंद होते.२४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजासमोर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. तर १० ते १५ मिनिटे रस्ता रोको केले. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एस.पी. पाठक यांना दिले. जागोजागी मोठी वाहने थांबविली होती. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसत होते. सकाळपासूनच शाळाही सोडून दिल्या होत्या. एकही दुकान सुरू नव्हते.आगारातून एकही बस गेली नाही. येथील आगारात ३६ बसेस आहेत. त्यापैकी २० बसेस पंढरपूर यात्रेला पाठविल्या आहेत. २४ जुलै रोजी आगारातून एकही बस पाठविली नाही. त्यामुळे आगाराचे ४ लाखांचे नुकसान झाले. २३ जुलै रोजी आगाराचे १३ हजार ७२२ कि.मी. रद्द झालेले आहे. फक्त नाशिक, पुणे व परभणीसाठी तीन बसेसच सोडल्या. बाहेरगावी गेलेली बस एकही परतली नाही. फक्त पंढरपूर येथून एकच बस आली होती. ग्रामीण भागातील बसेस तर तीन ते चार दिवसांपासून बंदच आहेत. खानापूर चित्ता व सावरखेडा येथे मुख्य रस्त्यावर चार ठिकाणी टायर जाळून रस्ता अडविला होता. पोलिसांनी जागोजाग पोलीस बंदोबस्त लावला होता. ट्रक चालकांनी आपले ट्रक जागोजागी उभे केले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा