अंजुमआरा शेख म. रियाज (रा. आझम कॉलनी, हिंगोली, ह. मु. सम्राट कॉलनी, वसमत) या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. क्रेटा कार घेण्यासाठी माहेराहून ६ लाख रुपये घेऊन का येत नाही, या कारणावरून विवाहितेस थापडाबुक्क्याने मारहाण केली. तसेच साक्षीदारासही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंजुमआरा शेख म. रियाज यांच्या फिर्यादीवरून शेख म. रियाज अब्दुल रहिम, शेख म. लतिफ शेख अब्दुल रहिम, नजिरूलनिसा बेगम, शेख खाजा शेख रहिम (सर्व रा. महादेववाडी, हिंगोली), आशा सुभान (रा. गवळीपुरा, वाशीम), खमरबेगम मीया मुसा, अख्तर बेगम यासीन (रा. हडको सिडको, नांदेड) यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शेख हकीम शेख समद करीत आहेत.
सहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST