हिंगोली जिल्ह्यात बुधवारी हिंगोली १, वसमत ४३, सेनगाव ६, कळमनुरी १३ अशा एकूण ६३ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. यापैकी एकही बाधित आढळला नाही. तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीत भट कॉलनी १, राम मंदिर गल्ली १, माळहिवरा १, एकांबा १, जलालधाबा १, माळहिवरा १, कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर १, वसमत येथील मंगळवार पेठ २ तर औंढा नागनाथ येथे तब्बल ११ जण आढळून आले आहेत. आज ९ जण बरे झाले आहेत. यामध्ये राजदरी २, घोळवा १, सुरेगाव १, कुरुंदा ४ व वसमतच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोनाचे एकूण ३५५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३४४४ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ६१ रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डात दाखल असलेल्यांपैकी ६ जण ऑक्सिजनवर तर ६ अतिगंभीर असल्याने बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने चिंता कमी झाली होती. मात्र, आज अचानक २० नवे रुग्ण समोर आले आहेत. शिवाय गंभीर रुग्णांसह अतिगंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. ही दोन्ही मिळून तब्बल १२ वर संख्या गेली आहे.