शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा

By रमेश वाबळे | Updated: July 21, 2023 18:37 IST

बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत.

हिंगोली : वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी होत असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकांच्या संरक्षणासाठी तार कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय वन अधिकारी कार्यालयावर २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेती बचाओ एल्गार मोर्चा काढण्यात आला. भर पावसात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी होते. 

जिल्ह्यातील बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत. शेतकरी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना तारकुंपन, सौर उर्जा कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर, गजानन कावरखे, दामूअण्णा इंगोले, नामदेव पतंगे, गोविंद भवर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय वन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा इंदिरा चौक, नांदेड नाका, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे रेल्वे उड्डाणपुलावरून विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पावसातही हजारो शेतकरी सहभागी झाले होते. वन अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तगडा पोलिस बंदोबस्तयावेळी पोलिस प्रशासनच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रूग्ण वाहिका, अग्निशमन बंब यासह ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

तार कुंपन मिळालेच पाहिजे...मोर्चात सहभागी पदाधिकारी, शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तारकुंपन मिळावे,  शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो आदी घोषणा सहभागी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येत होत्या.

टॅग्स :forestजंगलFarmerशेतकरीHingoliहिंगोली