जिनिंगला आग लागून मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:42+5:302021-01-19T04:31:42+5:30

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हनुमानदास मुंदडा यांची ही जिनिंग आहे.या ठिकाणी खासगी कापूस खरेदी करून त्याच्या कापूस गाठी केल्या जातात. ...

Major damage to ginning by fire | जिनिंगला आग लागून मोठे नुकसान

जिनिंगला आग लागून मोठे नुकसान

Next

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हनुमानदास मुंदडा यांची ही जिनिंग आहे.या ठिकाणी खासगी कापूस खरेदी करून त्याच्या कापूस गाठी केल्या जातात. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कापूस प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. कामगारांनी मिळेल, त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. मात्र, आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर, हिंगोली पालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दीड तासांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस जळून तर काही कापूस भिजल्याने नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे, तर या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामाही केल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Major damage to ginning by fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.