शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिघाडी! ठाकरेसेनेच्या खासदार नागेश आष्टीकरांनी केली कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची तक्रार

By विजय पाटील | Updated: June 28, 2024 16:57 IST

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

हिंगोली : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढल्यानतंर विजयाचा मार्ग सुकर झाला होता. थोड्याबहुत असलेल्या कुरबुरी आता मात्र वादात रुपांतरित होणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या आ.प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या विरोधात काम केल्याची तक्रार खा.नागेश आष्टीकर यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. हिंगोली लोकसभेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र काँग्रेसला ही जागा सोडवून घेता आली नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या आ.प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीत अलिप्तवादी भूमिका घेतली हेाती. त्या प्रचार कार्यात सहभागी झाल्या नव्हत्या. लोकसभा निवडणूकही झाली. इंडिया आघाडीचे आष्टीकर निवडूनही आले. आता पुन्हा सातव यांचा कळमनुरी विधानसभेवर डोळा आहे. त्या काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोडण्याची मागणी करू लागल्या आहेत. तर तो न मिळाल्यास अपक्षही उभ्या राहू शकतील, अशी चर्चा रंगत आहे. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या. कळमनुरीत डझनभर नेते असतानाही सक्रिय नसल्यासारखी वाटणारी शिवसेना अतिशय आक्रमकपणे पुढे येत आहे. मात्र या मार्गात सातव यांचा अडसर होवू नये, यासाठी आता खा.आष्टीकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

खा.आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या विरोधात थेट पक्षाच्या सरचिटणीसांकडे तक्रार केली आहे. सातव यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या विरोधात भूमिका घेत इंडिया आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप केला. सातव यांनी काँग्रेस पक्षाचे निर्देश डावलून वंचित बहुजन आघाडी व महायुतीच्या उमेदवाराचे काम केले. सातव यांच्या या भूमिकेमुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. शिवाय सातव यांनी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून इंडिया आघाडीच धर्म टिकविण्यासाठी शिस्तविषयक कारवाईची मागणी केली

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी