शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 19:06 IST

आज सभापती निवडीतही शिवसेनेने काँग्रेसमधील फुटीचा फायदा घेत समाजकल्याण सभापतीपदासाठी अर्ज भरला.

ठळक मुद्देविषय समिती निवडणूकसातव, दांडेगावकरांना सेनेची धोबीपछाड  

हिंगोली : महाविकास आघाडीला हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे नवखे आ. संतोष बांगर यांनी सुरुंग लावत अनुभवी व दिग्गज असलेल्या जयप्रकाश दांडेगावकर आणि राजीव सातव यांना राजकीय मात दिली. शिवसेनेने एक जास्तीचे सभापतीपद बळकावत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बंडखोरांना सभापतीपदी विराजमान करण्यात मोलाची भूमिका बजावली.

हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १0, भाजप ११ व अपक्ष ३ असे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या एका सदस्याचे पद अनर्ह ठरलेले आहे. महाविकास आघाडीच्या बोलणीनुसार सेनेला अध्यक्ष व महिला बालकल्याण, राकाँला उपाध्यक्ष व कृषी तर काँग्रेसला शिक्षण व समाजकल्याण ही पदे ठरली होती. उपाध्यक्षाची निवड करतानाही शिवसेनेने राष्ट्रवादीचे मनीष आखरे यांच्या पाठीमागे बळ उभे केल्याने पक्षाला यशोदा दराडे यांना माघार घेण्यास सांगावे लागले.

आज सभापती निवडीतही शिवसेनेने काँग्रेसमधील फुटीचा फायदा घेत समाजकल्याण सभापतीपदासाठी अर्ज भरला. राजीव सातव गटाला बाहेर ठेवण्याचा डाव आखला होता. यात यशही आले. सेनेचे फकिरा मुंढे हे ४३ मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसचे डॉ. सतीश पाचपुते यांना अवघी ८ मते मिळाली. तर सेनेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी इतर कुणाचाच अर्ज नसल्याने रुपाली पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. इतर दोन सभापतीपदांसाठी राष्ट्रवादीने यशोदा दराडे तर काँग्रेसने कैलास सोळुंके यांच्या नावे व्हिप दिला होता. मात्र सेना व भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांनी ३५ तर शिवसेना, राष्ट्रवादीचा फुटीर गट, अपक्ष व भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटाच्या भरवशावर २४ मते घेत काँगे्रसचे बंडखोर बाजीराव जुमडे यांनी विजयश्री खेचली. सातव गटाचे कैलास सोळुंके यांना ऐनवेळी भाजपच्या ११ मतांची साथ लाभल्याने ते १८ मतांवर गेले. मात्र मतदानात एवढी फाटाफूट झाली की महाविकास आघाडीतील एका पक्षाचा ताळमेळ दुसऱ्याला नव्हता.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस