शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :हिगोली जिल्ह्यात ६३.०६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 17:21 IST

Maharashtra Election 2019 : मतदार यादीत नाव नसल्याचा गोंधळ

ठळक मुद्देमतदान शांततेत

हिंगोली : विधानसभेच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, आणि हिंगोली मतदारसंघात शांततेने आणि उत्साहाने मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६३.०६ टक्के मतदान झाले अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदारसंघातील १ हजार १ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. वसमत मतदारसंघात ३२२, कळमनुरी मतदार संघात ३४५ आणि हिंगोली मतदार संघात ३३४ मतदान केंद्रावर  शांततेत मतदान झाले. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा ओघ कमी होता. सायंकाळी उशिरा वसमत मतदारसंघात ७२.११, कळमनुरीत ६८.६५ तर हिंगोलीत ६१ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला. पावसामुळे काही भागातील साहित्य येण्यास विलंब होत होता.

सोशल मीडियातून मतदानाचा हक्क बजावावा याबाबत फिरत होते मेसेजसोशल मीडियातून अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे छायाचित्र पोस्ट करून आपणही मतदान करावे असे आवाहन केले जात होते. नवमतदारांत उत्सुकता दिसून आली. हिंगोली शहरातील विविध बुथवर नवमतदारांच्या रांगाही पाहावयास मिळाल्या. 

मतदार यादीत नावे शोधण्यात वेळनिवडणूक दरम्यान मतदान करण्यासाठी बुथवर आलेल्या मतदारांना यादीत नाव शोधावे लागले. अनेकांची तर नावेच सापडत नसल्याने त्यात बराच वेळ जात होता. यावेळी बुथवरील कर्मचारी व कार्यकर्ते मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी मदत करताना दिसून आले. ओळखपत्राची चाचपणी केल्यानंतरच मतदान करू देण्यात येत होते.  

पोलीस बंदोबस्त निवडणूक दरम्यान मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेत कडेकोट पोलीस बंदोबस्त दिसून आला.

पावसामुळे मतदानावर परिणामविधासभा निवडणूक दरम्यान मतदानासाठी जिल्हाभरातील बुथवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लागल्या होत्या. परंतु काही ठिकाणी पाऊस झाल्याने मतदानावर परिणाम झाला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019hingoli-acहिंगोलीkalamnuri-acकळमनुरीbasmath-acवसमतHingoliहिंगोली