शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

lok sabha election 2019 : मुख्य पक्षांमधून उमेदवारी निश्चित होत नसल्याने अस्थिरता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:43 IST

भाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे.

- विजय पाटील  

हिंगोली : लोकसभा मतदारसंघातील उमेदवारच निश्चित होत नसल्याने सर्वच पक्षांना घोर लागलेला आहे. काँग्रेस व शिवसेनेत लढत होणार की एखादा पक्ष ही जागा दुसऱ्याला सोडणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खा. राजीव सातव यांनी अजूनही त्यांच्या उमेदवारीचे पत्ते उघड केलेले नाहीत.  मध्यंतरी आ. संतोष टारफे यांनीही चाचपणी फेरी केल्याने या संभ्रमावस्थेत अधिकच भर पडली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून मागच्या वेळी पराभूत झालेले सुभाष वानखेडे आता भाजपमध्ये आहेत. तर सेनेला येथे नवा चेहरा द्यावा लागणार आहे. तो निवडणेच अवघड बनले आहे. आ.जयप्रकाश मुंदडा, आ.हेमंत पाटील व आ.नागेश पाटील आष्टीकर हे तिघे इच्छुक आघाडीवर आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, याच्या चर्चा झडत आहेत. मात्र निर्णय होताना दिसत नाही. काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ आहेत. मागच्या वेळी तब्बल २३ जण रिंगणात होते. यंदा थेट लढतीचीच चिन्हे आहेत. 

वावड्याभाजपकडून इच्छुकांना अजूनही हा मतदारसंघ श्रेष्ठी सोडवून घेतील, असे वाटत आहे. कधी भिवंडी तर कधी कुठल्या तरी मतदारसंघाचे नाव सांगून कार्यकर्त्यांना ‘जागे’ ठेवले जात आहे. दुसरीकडे शिवराज पाटील चाकूरकरांसाठी उस्मानाबाद काँग्रेस सोडवून घेणार असल्याचे सांगून हिंगोली राष्ट्रवादीला परत केला जाणार असल्याच्या नव्या वावड्यांना तोंड फुटले आहे. सूर्यकांता पाटील पुन्हा राकाँत येऊन लढणार असल्याचे सांगितले जाते. उमेदवाऱ्या जाहीर करेपर्यंत या वावड्या उठतच राहणार असल्याचे दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHingoliहिंगोलीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस