शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरांचे लॉक तोडले अन् पेट्रोलिंग गाडी धडकली; चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला, तेलगूतून शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 19:21 IST

चिखलाच रस्ता आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. 

- रमेश कदमआखाडा बाळापूर  ( हिंगोली ) :  बाळापूरमध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. सशस्त्र चोरट्यांनी साईनगर परिसरात तीन घरांच्या गेटचे कुलूप तोडले. चोरीचा प्रयत्न करत असतानाच रात्रगस्तीवर असलेले पोलिस धडकले. यामुळे चोरट्यांनी पोलिसा काठीने हल्ला केला. मध्यरात्रीच्या अंधारात चोर आणि पोलिसांचा हा खेळ पहाटेपर्यंत चालला. मात्र, चिखलाच रस्ता आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. 

आखाडा बाळापूर येथील साई मंदिर परिसर व माधवनगर परिसरात दिनांक 1 जुलै रोजी रात्री बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरी चोरीचे प्रयत्न केले. एका घराच्या गेटचे कुलूप तोडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रात्र गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी राजीव जाधव व सरकटे चोरट्यांचा मागोवा  घेत तिकडे पोहोचले. पोलिस पाठलाग  करत असल्याचे समजताच गेटचे कुलूप तोडलेले घर सोडून चोरटे दुसऱ्या भागाकडे गेले . तिथेही घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पुन्हा पोलीस पाठलाग करत गेले. त्यावेळी त्यांना चार सशस्त्र चोरटे दिसले. 

दरम्यान, चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी दुचाकी आडवी लावली. त्यामुळे संतप्त चोरट्यांनी हातातली बांबूची काठी पोलिसांवर भिरकवली. रात्र गस्तीला असलेले पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे  इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले . रात्रभर चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . परंतु नाल्याच्या बाजूने अंधाराचा आणि चिखलाचा आधार घेत चोरटे पसार झाले. 

पोलीस घटनास्थळी असतानाही हे सशस्त्र चोरटे तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत होते. पोलिसांसोबत माधवनगर,  साईनगर भागातील नागरिकही जागे झाले होते . परंतु सशस्त्र चोरट्यांचा पाठलाग करताना कोणीही पुढे धजावले नाही. काही दिवसांपूर्वीच या भागात तीन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असतानाच चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली