शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

भाषिक संकोच अन् विरोध वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:16 IST

ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण केले आहे. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण केले आहे. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंगोली ग्रंथोत्सव-२०१८’च्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून कौतिकराव ठाले पाटील बोलत होते. या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य तथा नियोजित मराठवाडा साहित्य समेल्लनांचे अध्यक्ष, समिक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोलीचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा. विलास वैद्य, अशोक अधार्पुरकर, कुंडलिकराव अतकरे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी ठाले पाटील पुढे म्हणाले की, मातृभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मराठवाड्यामध्ये निजामाचे सत्ता असल्यामुळे भाषिक मागासलेपण व शैक्षणिक मागासलेपण कायम राहिले. त्यामुळेच मराठवाड्यात वाचन संस्कृती म्हणावी त्या प्रमाणात रुजली नाही. हिंगोली जिल्ह्यात सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी विशेष परिश्रम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, वाचनसंस्कृती वाढावी यासाठी शासनाने सुरु केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम स्तुत्य आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, विलास वैद्य यांची समोयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक सहाय्यक संचालक सुनील हुसे यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहित्यिक, वाचनप्रेमी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्विनी आसेगावकर यांनी केले. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी आभार मानले.पुर्वीच्या शिक्षकांमध्ये परोपकाराचा संस्कार करण्याची मानसिकता होती. त्यांच्यात जात दडली नव्हती. परंतु सध्याचे सामाजिक पर्यावरण फार दूषित झाले आहे. आता नजरेतून जात दिसत नाही; परंतु वर्तनातून मात्र जात स्पष्ट दिसते. यावर एकच उतारा असून ग्रंथच माणसाच्या वर्तणुकीच्या उत्क्रांतीसाठी प्रेरक ठरू शकतात. माणुुसकीच्या वर्तनाचा, वागणुकीचा पुन्हा पुन्हा ग्रंथच विचार करायला लावतात. नव्या संवेदना व स्वाभिमानाच्या जाणिवा ग्रंथ देतात. त्यामुळे ग्रंथ माणुसकीसाठी वरदान ठरतात, असे उत्सव माणुसकीसाठी पुन्हा-पुन्हा भरले पाहिजेत.हिंगोली ग्रंथोत्सवाची सुरुवात सकाळी ग्रंथ दिंडीने झाली. अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी शुभारंभ झाला. जि.प.बहुविध प्रशाला ते कल्याण मंडपम्पर्यंत दिंडी काढली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक