शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अन् स्थानक परिसरात लावले माहितीफलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:48 IST

येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत

हिंगोली : येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत. सदर माहितीफलक नसल्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांब पल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा ताळमेळ नव्हता.हिंगोली येथील बसस्थानकाच्या नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला, असला तरी सदर प्रक्रिया संथगतिने सुरू आहे. जून महिन्यात जुनी इमारत पाडून बांधकामास प्रारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय स्थानक परिसरातील उपहारगृह, दुकानचालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र इमारत बांधकामास हालचाली दिसून येत नव्हत्या. याबाबत आगारप्रमुखही काही बोलण्यास तयार नाहीत.सदर बांधकाम प्रक्रिया विभागीय कार्यालय पभरणी येथून सुरू असल्याचे सोयीस्कर उत्तर दिले जात आहे. ऐन सणासुदीतच इमारत पाडण्यास अचानक सुरूवात केल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पर्यायी व्यवस्था म्हणून बसथांब्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी, या ठिकाणी साधे कोणती बस कोठून धावणार याचे माहिती फलकही बसविले नव्हते. त्यामुळे विविध मार्गावरून धावणाऱ्या बस कोठे उभ्या राहणार आहेत, हेच प्रवाशांना समजत नव्हते. शिवाय फलकही डकविण्यात आले नसल्यामुळे प्रवाशांना कंट्रोल रूमकडे चकरा माराव्या लागत असत.ऐन सणासुदीत प्रवाशांची तारांबळ उडत असल्याचे लोकमतने ५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी माहितीफलक लावण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात का होईना, गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportराज्य परीवहन महामंडळ