शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

By रमेश वाबळे | Updated: July 6, 2024 12:14 IST

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे.

हिंगोली : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व सगेसोयरे कायदा अंमलात आणावा, यासाठी हिंगोलीतून संवाद रॅलीचा प्रारंभ मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (दि.६) होत असून या रॅलीसाठी लाखों मराठा समाजबांधव हिंगोली ते दाखल झाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली. शासन मात्र चालढकल करीत असल्याने ६ ते १३ जुलै यादरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मराठा आरक्षण संवाद रॅली शांततेच्या मार्गाने काढण्याचा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यानिमित्त हिंगोलीत आज मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. 

५१ उखळी तोफांची दिली जाणार सलामी...मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे. यावेळी ५१ उखळी तोफांची सलामी दिली जाणार आहे. त्यानंतर याच ठिकाणाहून रॅलीला प्रारंभ होणार आहे. ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने काढली जाणार असून, जवळपास साडेतीन लाख समाजबांधव या रॅलीला राहतील, असा अंदाज संयोजक समितीने व्यक्त केला.

मराठा आरक्षण संवाद रॅलीचा हिंगोलीतून श्रीगणेशा...मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा ‘श्रीगणेशा’ हिंगोलीतून होत आहे. ही रॅली हिंगोलीत ६ जुलै, परभणीत ७ जुलै, नांदेड ८ जुलै, लातूर ९ जुलै, धाराशिव १० जुलै, बीड ११ जुलै, जालना १२ जुलै व संभाजीनगर येथे १३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

चोख पोलिस बंदोबस्त...रॅलीच्या निमित्ताने जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ५५ पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस दलातील ४५० कर्मचारी तसेच लातूरहून १५० पोलिस बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोलीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील