शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय परीक्षेत नियोजनाचा अभाव; चिमूकल्यांनी धुळीत थंड फरशीवर बसून सोडवला पेपर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:25 IST

या सर्व गोंधळात परिक्षेचा वेळ जात असल्याने पालकांनी तिव्र संताप व्यक्त केला.

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि.हिंगोली): नवोदय परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची नियोजना अभावी मोठी गैरसोय पहावयास मिळाली. पालकांनी तिव्र संताप व्यक्त करताच शिक्षण विभागाने धावाधाव करत धुळीने माखलेली फरशी पुसून त्यावर विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली. या सर्व गोंधळात परिक्षेचा वेळ जात असल्याने पालकांनी तिव्र संताप व्यक्त करत शिक्षण विभागाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.

जिल्हयात नवोदय परिक्षेसाठी २५ केंद्रावर ८ हजार विद्यार्थ्यांसाठी परिक्षेचे नियोजन करण्याबाबत १६ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी बैठक घेऊन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या होत्या. १८ जानेवारी रोजी शहरासह तालुक्यातील सहा परिक्षा केंद्रावर २४७० परिक्षार्थी परिक्षा देणार होते. जिल्हा परिषद शाळेवरील परिक्षा केंद्रावर नवोदय परिक्षार्थी विद्यार्थ्यांना धुळ आसलेल्या फरशीवर परिक्षेसाठी बसवण्यात आले. जागे अभावी याच केंद्रावर दोन हॉल एकत्रित करण्यात आले होते. परिक्षा तणाव मुक्त होण्यासाठी परिक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना सुविधा आणि शांतता मिळाली नाही. विद्यार्थ्यांच्या गैरसोयी बाबत पालकांना कळताच त्यांनी केंद्रावरील शिक्षकांना खडेबोल सुनावले. त्यानंतर धावाधाव करत धुळीने माखलेल्या फरशीवर बसलेल्या विद्यार्थ्यांना बाजुला करत साफसफाई करण्यात आली. केंद्रावर परीक्षा सोडून अर्धातास हाच गोंधळ सुरू होता. माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी सतीश कास्टे यांनी परिक्षा केंद्रावर भेट देऊन सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनाचे पितळ उघडे पडून निष्क्रियता समोर आल्याची तीव्र प्रतिक्रिया पालकांनी दिली.

विद्यार्थी अपात्र ठरला तर शिक्षण विभाग जबाबदार...परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सुविधा देणे गरजेणे आसतांना येथे शिक्षण विभागाने कोणतीही सुविधा दिली नाही. धुळीने माखलेल्या फरशीवर त्यांना बसविण्यात आले. एकाच हॉल मध्ये दोन हॉलच्या विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. जर विद्यार्थी अपात्र ठरला तर याला शिक्षण विभाग जबाबदार राहील.- चंद्रशेखर देशमुख,पालक.

धुळीने माखलेल्या खोलीत परिक्षा घेण्यात आली. परिक्षार्थी धुळीत का बसवले ? असे विचारताच यांच्याकडे उत्तर नव्हते. - शेख सरवर,पालक.

सुविधे संदर्भात सुचना दिल्या होत्या...१६ जानेवारी रोजी बैठकीत सर्व केंद्र संचालकांना परिक्षा केंद्रावर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्या संदर्भात सुचना दिल्या होत्या. जिप शाळेच्या केंद्रावर भेट देऊन परिक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था करुन देण्यात आली.- सतीष कास्टे, गटशिक्षणाधिकारी, वसमत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षा