शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हा रूग्णालयात रक्त तुटवडा; दात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 17:31 IST

मागील काही दिवसांपासून रक्तदान  शिबीरांचे प्रमाण कमी झाल आहे.

ठळक मुद्दे ‘ए’ पोझीटीव्ह रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नाही ‘ओ’ निगेटीव्हच्या ३ रक्त बॅग शिल्लक

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.  

मागील काही दिवसांपासून रक्तदान  शिबीरांचे प्रमाण कमी झाल आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त पिशव्यांचा मुबलक साठा उपलब्ध नाही. त्यामुळे गरजू रूग्णांची ऐनवेळी गैरसोय होत आहे. तर जिल्हा रूग्णालयात तसेच इतर खाजगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरजूंना वेळेत रक्त पिशव्या मिळत नसल्याचे दिसून येत आहे. रूग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. त्यात काही रक्त गटांच्या तर पिशव्याचा उपलब्ध नाहीत. ज्या रक्त गटाच्या आहेत त्याही अल्प प्रमाणात आहेत. दरदिवशी विविध रक्त गटाच्या जवळपास २५ रक्त पिशव्यांची आवश्यकता भासते. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे. जेणेकरून एखाद्या रक्ताची गरज असणाऱ्या रूग्णाचे प्राण वाचविण्यास मदत होईल.

२२ जुलै २०१९ रक्तपेढीतील पिशव्यांची संख्या...हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत २२ जुलै रोजी ‘ए’ पोझीटीव्ह रक्तगटाची एकही पिशवी उपलब्ध नाही. तसेच ‘ए’ निगेटीव्ह रक्त गटाची केवळ १ पिशवी उपलब्ध आहे. ‘बी’ पोझीटीव्ह रक्त गटाच्या १५ पैकी १३ बॅग शिल्लक आहेत. ‘बी’ निगेटीव्ह रक्तगटाची केवळ एक बॅग शिल्लक आहे. ‘एबी’ पोझीटीव्ह, ‘एबी’ निगेटीव्ह तसेच ‘ओ’ पोझीटीव्हची एकही बॅग रक्तपेढीत उपलब्ध नाही. तर ‘ओ’ निगेटीव्हच्या ३ रक्त बॅग शिल्लक असल्याची माहिती रक्तपेढीतर्फे देण्यात आली. २० पैकी केवळ १८ रक्त पिशव्याच उपलब्ध आहेत. रक्त पिशव्यांची मागणी जास्त आणि प्रत्येक्षात असलेला रक्तसाठा कमी असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीBlood Bankरक्तपेढीhospitalहॉस्पिटल